१०३ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद

By admin | Published: July 2, 2014 12:36 AM2014-07-02T00:36:14+5:302014-07-02T00:36:14+5:30

अहमदनगर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने, मंगळवारपासून जिल्ह्यातील १०१ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

Stop working for 103 medical officers | १०३ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद

१०३ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद

Next

अहमदनगर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने, मंगळवारपासून जिल्ह्यातील १०१ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था उभी केली आहे.
जिल्ह्यात सध्या ११३ स्थायी आणि ६३ अस्थायी, १५ बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आहेत. ‘मॅमो’ संघटनेच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांनी शासनाकडे त्यांच्या विविध मागण्या सादर केल्या होत्या. मात्र, शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यापूर्वी या डॉक्टरांनी चार जूनला आंदोलन केले होते. त्यावेळी दहा दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दुर्लक्ष झाल्याने संघटनेने मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात जिल्ह्यातील १०३ वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होऊ नये, यासाठी तातडीने ३० आंतरवासीता प्रशिक्षणार्थी डॉक्टर, स्कूल हेर्थचे १२ डॉक्टर आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यांची मदत घेण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी पी.डी. गांडाळ यांनी सांगितले.

Web Title: Stop working for 103 medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.