औषधविक्रेते उद्यापासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 02:44 PM2018-09-27T14:44:11+5:302018-09-27T14:44:15+5:30

मोठ्या प्रमाणात सुरू असलेली आॅनलाईन औषधविक्री शासनाने बंद करावी या मागणीसाठी शुक्रवारी औषध विक्रेत्यांनी संप पुकारला आहे.

Shutters from tomorrow | औषधविक्रेते उद्यापासून संपावर

औषधविक्रेते उद्यापासून संपावर

Next

अहमदनगर : मोठ्या प्रमाणात सुरू असलेली आॅनलाईन औषधविक्री शासनाने बंद करावी या मागणीसाठी शुक्रवारी औषध विक्रेत्यांनी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार विक्रेते आपली दुकाने बंद ठेवून सहभागी होणार आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी शहरासह ग्रामीण भागातील काही हॉस्पिटलमध्ये औषध विक्री सुरू राहणार आहे.
सध्या देशभर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य आॅनलाईन औषध विक्री होत असून, त्याचा औधषविक्रेत्यांना फटका बसत आहे. त्यामुळे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने अशा विक्रीस विरोध केला आहे. ही औषधविक्री बंद व्हावी यासाठी संघटनेने याआधी दोनदा बंद पुकारला होता. परंतु केंद्र सरकारकडून याबाबत दखल न घेतल्याने शुक्रवारी पुन्हा आंदोलनाचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला आहे. या संपात जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.
अशा स्थितीत रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्यात व शहरातील काही औषध विक्री दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनानेही त्याची तयारी केली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात (सिध्दीविनायक कॉलनी, सावेडी) स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
याशिवाय शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटल, सिद्धीविनायक हॉस्पिटल (सक्कर चौक), नोबल हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल, स्वास्थ्य हॉस्पिटल, साई एशियन हॉस्पिटल (तारकपूर), मॅक्सकेअर हॉस्पिटल, सुनील जाधव हॉस्पिटल (चौपाटी कारंजा), डॉ. अनभुले हॉस्पिटल (प्रेमदान चौक), डॉ. फाटके हॉस्पिटल (स्टेशन रोड), न्यू किल्स हॉस्पिटल यांच्या दुकानांतून औषध विक्री सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातही अशाच खासगी हॉस्पिटलमध्ये औषध विक्री सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्ही. ए. कोसे यांनी कळवले आहे.

Web Title: Shutters from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.