श्रीरामपूरच्या काजळेंनी साठीत केली ‘लोकमत मॅरेथॉन’ पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:47 PM2017-11-06T17:47:29+5:302017-11-06T17:50:37+5:30

Shrirampur's Kajale has been completed 'Nashik Lokmat Marathon' | श्रीरामपूरच्या काजळेंनी साठीत केली ‘लोकमत मॅरेथॉन’ पूर्ण

श्रीरामपूरच्या काजळेंनी साठीत केली ‘लोकमत मॅरेथॉन’ पूर्ण

Next

श्रीरामपूर : नाशिक येथे पार पडलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत श्रीरामपूर नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी व धावपटू अनिल काजळे यांनी २१ कि.मी.अंतर दोन तास अकरा मिनिटांत पार केले. वयाच्या ६० व्या वर्षी केलेल्या या अफलातून कामगिरीने त्यांनी युवकांसमोर खेळातील आदर्श उभा केला आहे.
राज्यस्तरावरील धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी बजावली आहे. या स्पर्धेत त्यांनी श्रीरामपूरचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र, तसेच पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या धाडसी कामगिरीबद्दल शहरावासीयांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. वयाच्या साठीत मॅरेथॉन गाजविण्यामागे दररोजचा व्यायाम, तसेच खडतर मेहनत कामी येत असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज नियमितपणे सुमारे दहा कि.मी.अंतर धावण्याचा सराव आपण करतो. भविष्यात आणखी स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ही कामगिरी बजावत आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर ते शक्य होत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Shrirampur's Kajale has been completed 'Nashik Lokmat Marathon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.