सुपर ओव्हरमध्ये श्रीरामपूरच्या मुलींच्या बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 07:13 PM2017-12-24T19:13:56+5:302017-12-24T19:24:37+5:30

पहिल्या दिवशी रंगलेल्या मुलींच्या संघातील अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीरामपूरच्या रामराव आदिक पब्लिक स्कूलच्या संघाने पाथर्डीच्या एम.एम. नि-हाळी विद्यालयावर एका धावेने मात केली.

Shrirampur girl's superhero superhero | सुपर ओव्हरमध्ये श्रीरामपूरच्या मुलींच्या बाजी

सुपर ओव्हरमध्ये श्रीरामपूरच्या मुलींच्या बाजी

Next
ठळक मुद्दे ३२ व्या राज्यस्तरीय क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धा

अहमदनगर : पहिल्या दिवशी रंगलेल्या मुलींच्या संघातील अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीरामपूरच्या रामराव आदिक पब्लिक स्कूलच्या संघाने पाथर्डीच्या एम.एम. नि-हाळी विद्यालयावर एका धावेने मात केली. उदघाटनीय सामना दुपारी वाडिया पार्क क्रीडा संकुलात झाला. सुरुवातीला पाथर्डी संघाने १५ षटकात २ बाद ९४ धावा चोपल्या तर प्रत्युत्तरादाखल श्रीरामपूर संघाने सर्वबाद ९४ धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला.
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व क्रॉम्टन ग्रीव्हज लिमिटेड, नगर यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी राज्यस्तरीय १९ वर्षाखालील क्रॉम्प्टन क्रिकेट करंडक स्पर्धेला जिल्हा क्रीडा संकुलातील वाडिया पार्क येथे रविवारपासून सुरुवात झाली. उद्घाटनाचा पहिला सामना श्रीरामपूरच्या रामराव आदिक पब्लिक स्कूल संघाने पाथर्डीच्या एम.एम. निºहाळी विद्यालय या दोन महिला संघात झाला. पाथर्डी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या अंबिका वाटाडे हिने २९ धावा केल्या. तिला साथ देत डावखुºया आरती केदारने २७ धावा चोपल्या. शेवटच्या षटकांत ज्ञानेश्वरी वाघ हिने फटकेबाजी करत २० धावा केल्या. पाथर्डी संघाने निर्धारित १५ षटकांत ९४ धावा केल्या. श्रीरामपूरच्या साक्षी वाळवी व आश्विनी आहेर या दोघींनी प्रत्येकी १ बळी घेतला. प्रत्युत्तरादाखल विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य श्रीरामपूर संघाला गाठता आले नाही. मात्र सामना टाय करण्यात श्रीरामपूरच्या संघाला यश आले. सलामीला आलेल्या साक्षी गावित हिने १७ तर मयुरी भोये हिने १० धावा चोपल्या. बाकीच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत १५ षटकात सर्वबाद ९४ धावा केल्या. पाथर्डीच्या शुभांगी सोनवणे हिने ३ षटकांत ३ बळी टिपले. ज्ञानेश्वरी वाघ हिने २ बळी टिपले.
सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर खेळविण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये श्रीरामपूरच्या संघाने १० धावा केल्या. तर पाथर्डी संघाला ९ धावाच करता आल्या. पाथर्डी संघाकडून साक्षी वाळवी हिने एका षटकात ९ धावा देत संघाला १ धावेने विजय मिळवून दिला. सामनावीर म्हणून वाळवी हिस गौरविण्यात आले. पंच म्हणून मिनिनाथ गाडीलकर व दत्ता विधाते यांनी तर धाव लेखनाचे काम अजय कविटकर यांनी पाहिले.

Web Title: Shrirampur girl's superhero superhero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.