शूरा आम्ही वंदिले : देशाभिमानासाठी उग्रवाद्यांशी लढा, बाजीराव तरटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:15 AM2018-08-19T11:15:14+5:302018-08-19T11:17:26+5:30

भारतीय सैनिक शत्रू राष्ट्रांच्या सैन्याविरोधात लढतच राहिले. त्याशिवाय अंतर्गत हितशत्रूंविरोधात सैन्याला उभे ठाकावे लागते़ त्याचबरोबर मित्रराष्ट्रांच्या मदतीलाही भारतीय सैन्य नेहमी तत्पर असते़ श्रीलंका या मित्रराष्ट्राच्या मदतीला भारतीय फौज गेली

Shoora we wandelike: fight for militant fighters, Bajirao Tare | शूरा आम्ही वंदिले : देशाभिमानासाठी उग्रवाद्यांशी लढा, बाजीराव तरटे

शूरा आम्ही वंदिले : देशाभिमानासाठी उग्रवाद्यांशी लढा, बाजीराव तरटे

googlenewsNext
ठळक मुद्दे शिपाई बाजीराव तरटेजन्मतारीख १ जून १९६६सैन्यभरती १५ नोव्हेंबर १९८६वीरगती २९ नोव्हेंबर १९८७सैन्यसेवा १ वर्षवीरपीता दत्तात्रय तरटे

भारतीय सैनिक शत्रू राष्ट्रांच्या सैन्याविरोधात लढतच राहिले. त्याशिवाय अंतर्गत हितशत्रूंविरोधात सैन्याला उभे ठाकावे लागते़ त्याचबरोबर मित्रराष्ट्रांच्या मदतीलाही भारतीय सैन्य नेहमी तत्पर असते़ श्रीलंका या मित्रराष्ट्राच्या मदतीला भारतीय फौज गेली अन् श्रीलंकेतही भारतीय सैन्याचा दबदबा निर्माण करण्यात यश मिळविले़ देशाभिमान जपण्यासाठी अनेक भारतीय जवानांनी श्रीलंकेत आपल्या निधड्या छातीवरती गोळ्या झेलल्या.
बेळगाव येथे वन मराठा इन्फन्ट्री बटालियनमध्ये १५ नोव्हेंबर १९८६ साली पळवे खुर्द (ता़ पारनेर) येथील बाजीराव तरटे हा जवान भरती झाला़ त्यावेळी सुमारे ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण बाजीराव यांना देण्यात आले़ या प्रशिक्षणानंतर त्यांना दोन महिन्यांची सुट्टी मिळणार होती़ मात्र, अचानक आॅक्टोबर १९८७ मध्ये श्रीलंकेत शांतीसेना पाठविण्याचा निर्णय भारतीय सैन्यदलाने घेतला़ त्यावेळी श्रीलंकेत स्वतंत्र तमीळ राष्ट्रासाठी हिंसाचार पेटला होता़ त्याचे पडसाद भारतातही तमीळबहुल भागात उमटत होते़ त्यामुळे श्रीलंकेत आणि पर्यायाने भारतात शांती प्रस्थापित होण्यासाठी श्रीलंका सरकारने हाती घेतलेल्या उग्रवाद्यांविरोधातच्या लढाईत उतरण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला़
स्वतंत्र तमीळ राष्ट्रासाठी लिबरेशन टायगर आॅफ तमीळ ईलम (एलटीटीई) या उग्रवादी संघटनेने श्रीलंकेत धुमाकूळ घातला होता़ काही शहरे या संघटनेने ताब्यात घेतली होती़ अनेक नागरिकांना बंदिवान बनविले होते़ त्यामुळे श्रीलंकेच्या सरकारने भारताकडे मदत मागितली़ त्यावेळी झालेल्या करारानुसार भारताने श्रीलंकेत शांतीसेना पाठविली़ ५४ इन्फंट्री डिवीजनच्या अंतर्गत वन मराठा लाईट इन्फंट्री बटालियन, पॅरा कमांडो, सीख रेजिमेंट, महार रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट अशा विविध बटालियनचे सुमारे दहा हजार प्रशिक्षित जवान श्रीलंकेत दाखल झाले होते़ त्यात बाजीराव तरटे यांचाही समावेश होता़
श्रीलंका सरकारने एलटीटीईच्या उग्रवाद्यांशी लढण्यासाठी ‘आॅपरेशन लिबरेशन’ हाती घेतले होते़ तर भारतीय लष्कराने एलटीटीईच्या विरोधात ‘आॅपरेशन पवन’ हाती घेतले होते़ आॅपरेशन पवनसाठी भारतीय लष्करातील वेगवेगळ्या तुकड्यांना एकत्रित करुन ५४ हवाई आक्रमण डिवीजन बनविण्यात आली होती़
एलटीटीईच्या उग्रवाद्यांनी जाफना या शहराला वेढा देऊन पूर्ण शहरच वेठीस धरले होते़ जाफना शहरापासून जवळच असणाऱ्या गुरुनगर या शहराला उग्रवाद्यांनी आपला तळ बनविले होते़ भारतीय शांतीसेनेला एलटीटीईच्या कब्जातून जाफना शहर मुक्त करायचे होते़ त्यासाठी हवाई आणि जमिनी हल्ला करण्याचा बेत आखण्यात आला़ प्रारंभीक लढाईत भारतीय सिख रेजीमेंटमधील २९ जवान आणि पाच कमांडो उग्रवाद्यांनी मारले़ उग्रवाद्यांमध्ये स्नाईपर टीम होती़ ही टीम दूरवरुन शांतीसेनेवर हल्ला करायची़ यात जाफना युनिव्हरसिटीजवळच्या लढाईत ४० भारतीय सैनिक मारले गेले़
तोपर्यंत भारतातून ४१ वी ब्रिगेड जाफना शहराजवळ पोहोचली होती़ वन मराठा लाईट इन्फंट्री आणि ४१ वी ब्रिगेड यांनी संयुक्त कारवाई हाती घेत नवनतुराई कोस्टल रोड, नाल्लुर भाग सुरक्षित केला़ त्यानंतर भारतीय सैन्याने गुरु नगर हा उग्रवाद्यांचा तळ उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला़ नोव्हेंबर १९८७ मध्ये वन मराठा लाईट इन्फंट्रीचा सामना थेट एलटीटीईसोबत झाला़ वन मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान बाजीराव तरटे यांचा २९ नोव्हेंबर १९८७ रोजी उग्रवाद्यांशी समोरासमोर सामना झाला़ यात ते शहीद झाली़ त्यांच्या छातीवर उग्रवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या़ देशातील शांतीसाठी तरटे यांनी दुसºया देशात जाऊन लढाई लढली़
वडिलांनी सुरु केलेला देशसेवेचा वारसा
नगर-पुणे महामार्गाजवळून अवघे पाच ते सहा किमी अंतरावर पळवे खुर्द (ता़ पारनेर) हे छोटेसे गाव़ येथील दत्तात्रय तरटे हे लष्करात जवान होते़ त्यांना फक्कडराव, बाजीराव व आनंदा अशी तीन मुले़ बाजीराव यांचा १ जून १९६६ रोजी जन्म झाला़ बाजीराव यांचे पहिले ते चौथी शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्यानंतर गावातच असणाºया भैरवनाथ विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण झाले़ पुढे अकरावी व बारावी शिरूर येथील सी़ टी़ बोरा विद्यालयात झाली़ वडील सैन्यात असल्याने आपल्या मुलांनीही सैन्यात जावे अशीच वडील दत्तात्रय यांची इच्छा होती़ मोठा मुलगा फक्कडराव हे सैन्यात होते़ त्यांच्या पाठोपाठ मधला मुलगा बाजीराव यांनाही सैन्यदलात पाठवले़
भावाला सैन्यात नोकरी
बाजीराव हे श्रीलंकेतील लढाईत शहीद झाले़ पण वडील दत्तात्रय यांनी हिंमत हारली नाही़ देशसेवेसाठी आमचा एक सुपूत्र कामी आला असा अभिमान बाळगत त्यांनी आमचा आणखी एक सुपुत्र आनंदा यांनाही सैन्यात घ्यावे, असा आग्रह सैन्यदलाकडे धरला़ देशसेवेचा सार्थ अभिमान बाळगणाºया तरटे कुटुंबाची ही मागणी सैन्यातील अधिकाºयांनी मान्य करीत बाजीराव यांचे बंधू आनंदा यांना सैन्यात दाखल करून घेतले़

शब्दांकन : विनोद गोळे

Web Title: Shoora we wandelike: fight for militant fighters, Bajirao Tare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.