धक्कादायक : पालकमंत्री राम शिंदे यांच्या गावात सापडला मुलीचा मृतदेह, चौंडीमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:04 PM2019-03-28T12:04:40+5:302019-03-28T12:09:41+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

Shocking: Guardian Minister Ram Shinde's body found in the body of the girl, excitement in Chundi | धक्कादायक : पालकमंत्री राम शिंदे यांच्या गावात सापडला मुलीचा मृतदेह, चौंडीमध्ये खळबळ

धक्कादायक : पालकमंत्री राम शिंदे यांच्या गावात सापडला मुलीचा मृतदेह, चौंडीमध्ये खळबळ

googlenewsNext

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. आरती पांडुरंग सायगुडे(वय-१७) असे मृत मुलीचे नाव आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे हे गाव आहे.
आरती चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. तेथूनच ती आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह तलाव परिसरात आढळून आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून तो कुजलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना चार दिवसांपुर्वी घडली असून आज ती उघडकीस आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुलीचा मृत्यू ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांना माहिती दिल्यानंतरही ते वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाही, असे गावक-यांचे म्हणणे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास वेगाने सुरु आहे.

Web Title: Shocking: Guardian Minister Ram Shinde's body found in the body of the girl, excitement in Chundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.