सीताराम गडावर अलोट गर्दी

By admin | Published: September 7, 2014 11:33 PM2014-09-07T23:33:26+5:302014-09-07T23:46:50+5:30

खर्डा : सीताराम गडावर रविवारी (दि़७) श्रद्धांजली वाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली़ हजारो भाविकांनी मुंडण करुन बाबांना श्रद्धांजली वाहिली़

Seataram fort on the crowd | सीताराम गडावर अलोट गर्दी

सीताराम गडावर अलोट गर्दी

Next

खर्डा : सीताराम गडावर रविवारी (दि़७) श्रद्धांजली वाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली़ हजारो भाविकांनी मुंडण करुन बाबांना श्रद्धांजली वाहिली़ तर शहरातील नाभिकांनी मोफत मुंडण करुन सीताराम बाबांवरील श्रद्धेचे दर्शन घडविले़
सीताराम महाराज उंडेगावकर यांचे २९ आॅगस्ट रोजी पुणे येथे देहावसान झाले़ समाधी सोहळा खर्डा येथे व्हावा, अशी भाविकांची इच्छा होती़ तर उंडेगाव (ता़ परांडा, जि़उस्मानाबाद) येथील भाविक उंडेगाव येथेच समाधी सोहळा व्हावा, यासाठी आग्रही होते़ त्यामुळे हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकला़ न्यायालयाच्या निकालानंतर मंगळवारी (दि़२) खर्डा येथे बाबांचा समाधी सोहळा झाला़ समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक खर्डा येथे आले होते़ बाबांच्या निर्वाणाला रविवारी (दि़७) दहा दिवस होत असल्यामुळे खर्डा येथील सीताराम गडावर हजारो भाविक दाखल झाले होते़ बाबांच्या भक्तांनी मुंडण करुन घेत बाबांना श्रद्धांजली वाहिली़ तर शहरातील नाभिकांनी स्वयंस्फूर्तीने मोफत मुंडण करुन बाबांवरील श्रद्धेचे दर्शन घडविले़ समाधी मंदिराचे दर्शन घेऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़ (वार्ताहर)

Web Title: Seataram fort on the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.