कुकडीचे आवर्तन लांबले : शेतक-यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:14 PM2018-10-10T16:14:51+5:302018-10-10T16:14:55+5:30

कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते.

The recurrence of the cooked meal: The concerns of the farmers increased | कुकडीचे आवर्तन लांबले : शेतक-यांची चिंता वाढली

कुकडीचे आवर्तन लांबले : शेतक-यांची चिंता वाढली

Next

निघोज : कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते. परंतु गणेशोत्सवात पाऊस न झाल्याने लागवडी योग्य झालेली कांद्याची रोपे पाण्याअभावी लावायचे कशी? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
परिसरात पाऊस नसतानाच आता कुकडीचे आवर्तन लांबले आहे. नेहमी कालवा भरून वाहणा-या निघोज बागायती पट्टयात दहा वर्षात पहिल्यांदाच पाण्याअभावी कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतक-यांनी कुकडीच्या आवर्तनाचे पाणी मिळण्यासाठी पाणी मागणी अर्ज निघोजच्या कुकडी सिंचन शाखेत वेळेत सादर करावेत, असे आवाहन कुकडी पाटबंधारे उपविभागच्या सहायक अभियंता एस.यु.डुंबरे व निघोजचे सिंचन शाखाधिकारी एम. ए. दिघे यांनी केले आहे.


कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत येणा-या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टिएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शेतक-यांनी पिकांचे नियोजन करावे. शेतक-यांनी अर्ज भरून पाण्याची मागणी करून पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. पाण्याची मागणी असल्यास आम्हाला सरकारी पातळीवर पाठपुरावा करता येतो. दसºयाला पाऊस झाल्यास पाणी लवकरही सोडण्यात येऊ शकते.
-एस.यु.डुंबरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव.


निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेच्या वतीने शेतक-यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. शेतक-यांची पाण्याची मागणी असल्यास आम्हालाही शासकीय पातळीवर भांडता येते. - माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अध्यक्ष, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था.


निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेच्या वतीने शेतक-यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. शेतक-यांची पाण्याची मागणी असल्यास आम्हालाही शासकीय पातळीवर भांडता येते. - माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अध्यक्ष, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था.

Web Title: The recurrence of the cooked meal: The concerns of the farmers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.