सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावरून दोन गटात राडा

By admin | Published: October 15, 2016 12:30 AM2016-10-15T00:30:28+5:302016-10-15T00:48:51+5:30

अहमदनगर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली़ यावेळी गज,काठ्या, तलवार व लाकडी दांड्याने झालेल्या

Rada in two groups from offensive content on social media | सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावरून दोन गटात राडा

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावरून दोन गटात राडा

Next


अहमदनगर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली़ यावेळी गज,काठ्या, तलवार व लाकडी दांड्याने झालेल्या मारहाणीत चार जण जखमी झाले़ ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील आशा टॉकीज चौकाजवळ घडली़
घटनेनंतर परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे़ याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकिब अन्सार शेख (तख्ती दरवाजा,नगर) याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आकाश निस्ताने याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून निस्ताने याच्यासह अमोल शर्मा, अजय, विजय (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी आशा टॉकिज चौकात येऊन घोषणाबाजी केली़ या फिर्यादीवरून पोलिसांनी निस्ताने याच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ महेश लालया बोडखे (रा़ नांगरे गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीत दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे़ या फिर्यादीवरून पोलिसांनी शाबिर शेख, फूरकान शबिर शेख, बोबीन शेख बोबो, मोहसीन उर्फ मामू कुरळेकेसवाले, शहाफौजल बुऱ्हाण शेख, शकिल शेख, अजहर शेख, जावेद भेळवाला, मोइन शरबतवाला, मयून उमर शेख, शहानावाज खान, दानिश शेख, मोहंम्मद गफूर यांच्यासह अज्ञात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ यावेळी झालेल्या मारहाणीत चार जण जखमी झाले.

Web Title: Rada in two groups from offensive content on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.