लष्करी जवानांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण; वाघुंडे गावाजवळ स्कूल बसला अपघात, ८ विद्यार्थ्यांसह बसचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:59 PM2017-12-23T18:59:54+5:302017-12-23T19:00:26+5:30

अहमदनगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे गावाजवळ भरधाव वेगाने येणा-या ट्रकने स्कूल बसला मागून जोराची धडक दिल्याने बस पलटी झाली. यामध्ये एक चिमुकला विद्यार्थी बसखाली हात सापडल्याने अडकला. ही परिस्थिती पाहून रस्त्याने चाललेल्या लष्करी जवानांनी धाव घेत एकीच्या बळावर बस उचलत चिमुकल्याचा प्राण वाचला.

Prima facie survivors of military jaws; School bus accident near Vadhur village, 8 students injured bus driver | लष्करी जवानांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण; वाघुंडे गावाजवळ स्कूल बसला अपघात, ८ विद्यार्थ्यांसह बसचालक जखमी

लष्करी जवानांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण; वाघुंडे गावाजवळ स्कूल बसला अपघात, ८ विद्यार्थ्यांसह बसचालक जखमी

Next

सुपा : अहमदनगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे गावाजवळ भरधाव वेगाने येणा-या ट्रकने स्कूल बसला मागून जोराची धडक दिल्याने बस पलटी झाली. यामध्ये एक चिमुकला विद्यार्थी बसखाली हात सापडल्याने अडकला. ही परिस्थिती पाहून रस्त्याने चाललेल्या लष्करी जवानांनी धाव घेत एकीच्या बळावर बस उचलत चिमुकल्याचा प्राण वाचला. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ८ विद्यार्थ्यांसह बसचालक जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर पळून गेला.
अहमदनगर-पुणे महामार्गावर शनिवार २३ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दिवटे पाटील पब्ल्कि स्कूलची स्कूल बस (क्रमांक एम.एच. १६, बी.सी. १०७) शाळा सुटल्यानंतर विद्यारर्थ्यांना घरी सोडण्यासाठी पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. यामध्ये एकूण २५ ते ३० विद्यार्थी होते. पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावाजवळ बस असताना मागून भरधाव वेगाने येणा-या ट्रकने (क्रमांक एम.एच.- १६, ए.ई.- ३२८३) बसला धडक दिली. धडकेमुळे बस पलटी झाली. याचवेळी रस्त्याने लष्करी जवान जात होते. अपघात पाहताच वाहने थांबवत जवानांनी बस उचलत ओम शिवले या चिमुकल्याची सुटका केली. या जवानांनी बसमधील सर्व मुलांना तातडीने उपचारासाठी सुप्यातील खासगी दवाखान्यात हलवले. या मदतकार्यात ग्रामस्थही सहभागी झाल्याचे वाघुंडेचे सरपंच संदीप मगर यांनी सांगितले. ओम शिवले व सूरज कुलट यांच्यावर सुप्यात उपचार करण्यात आले. शिवले या विद्यार्थ्यास जास्त मार लागण्याने पुढील उपचारासाठी पुण्यास पाठवल्याचे डॉ. बाळासाहेब पठारे यांनी सांगितले. कृष्णा कुटे, पूजा कुटे, सृष्टी भांगरे, आदित्य दिवटे, निधी शिवले, पृथ्वीराज कार्ले यांच्यावर प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. बसचालक चंद्रकांत फलके यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Prima facie survivors of military jaws; School bus accident near Vadhur village, 8 students injured bus driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.