नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 08:20 PM2017-11-22T20:20:08+5:302017-11-22T20:23:35+5:30

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

Prepare 12 lakh three thousand three hundred quintals of sugar in 21 days | नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

googlenewsNext
ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

अहमदनगर : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
हंगामाच्या प्रारंभीच ऊस दराचे आंदोलन पेटले असले तरी कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत सुरू झाला आहे. आजारातून सावरलेल्या राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असला तरी परवाना न मिळाल्याने या कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही. त्यांचा ५ डिसेंबरला गाळप सुरू होणार आहे. एफ. आर.पी. थकबाकीमुळे साईकृपा-२ सुरू झालेला नाही. कोपरगावच्या संजीवनी कारखान्याने ७५ हजार ८८१.२२ मे. टन उसाचे गाळप करून ६० हजार ५२५क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. काळे कारखान्याने ७५ हजार ५६९.०४ मे.टन गाळपातून ६२ हजार२०० क्विं., गणेश कारखान्याने २७ हजार ५० मे.टन गाळप करून १९ हजार ४७५ क्विं., अशोक ५५ हजार ७३० मे.टन गाळपातून ४२ हजार ८५० क्विं., विखे ६२ हजार ७०० मे.टन गाळपातून ५२ हजार ९०० क्विं., श्रीगोंदा कारखान्याने ९० हजार ५५५.७३ मे.टन गाळपातून ८२ हजार ७५० क्विं., थोरात कारखान्याने १ लाख ३९ हजार १४० मे.टन गाळपातून १ लाख २१ हजार ४७० क्विं., ज्ञानेश्वर कारखान्याने ९५ हजार ३० मे.टन ७३ हजार ८०० क्विं., वृद्धेश्वर कारखान्याने ५१ हजार ४१५ मे.टन ३९ हजार ३५० क्विं., मुळा कारखान्याने ९५ हजार ३२० मे.टनातून ७८ हजार ६५० क्विं., अगस्ती कारखान्याने ६९ हजार ५२३.८८ मे. टनातून ५६ हजार ८४० क्विं., कुकडी ९१ हजार ८०० मे.टनातून ८० हजार ६५० क्विं., क्रांती शुगर (पारनेर)३० हजार ७१५ मे.टनातून २५ हजार ९०० क्विं., पीयूष शुगर(नगर) २५ हजार ३२० मे.टन १३ हजार ५०० क्विं., अंबालिका कारखान्याने २ लाख १३ हजार २८५मे.टनातून १ लाख ९९ हजार ५५० क्विं., गंगामाई (शेवगाव) १ लाख १५ हजार ६०५ मे.टनातून ८६ हजार २८० क्विं., साईकृपा-१ने ३८ हजार ८९५ मे.टनातून ३८ हजार ५०० क्विं., प्रसाद शुगर ५४ हजार ९६० मे.टनातून ४३ हजार ४०० क्विंटल, जय श्रीराम शुगरने ३३ हजार ७३८ मे.टनातून २४ हजार ७१० क्विंटल़
अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सहकारी व खाजगी अशा जिल्ह्यातील दोन्ही प्रकारच्या १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

Web Title: Prepare 12 lakh three thousand three hundred quintals of sugar in 21 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.