In Pathardi, it caught three lakh rupees | पाथर्डीमध्ये तीन लाखांची रक्कम पकडली
पाथर्डीमध्ये तीन लाखांची रक्कम पकडली

पाथर्डी : तालुक्यातील शेवगाव- पाथर्डी रोडवरील काळेगाव शिवारात सोमवारी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या पथकाने तीन लाख रुपयांची रक्कम पकडली.
इंडिका कारची (क्र. एम.एच १६ क्यू ८४२५) तपासणी करत असताना प्रदीपकुमार लक्ष्मण ढोले (रा. दुलेचांदगाव) यांच्याकडे तीन लाख रुपये मिळून आले. या रकमेचा पंचनामा करुन शेवगाव तहसील मार्फत नगर ट्रेझरी येथे जमा करण्यात आले आहेत. पथक प्रमुख प्रशांत तोरवणे, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब खाटीक, एकनाथ बुधवत, कृष्णा बडे, लक्ष्मण गिरी, संदीप कराड यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.
 


Web Title: In Pathardi, it caught three lakh rupees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.