पारनेर मतदारसंघ निवडणूक निकाल : निलेश लंके यांची आघाडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:00 AM2019-10-24T10:00:32+5:302019-10-24T10:01:36+5:30

पारनेर विधानसभा मदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी ९ हजार ३१६ मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे उमेदवार विजय औटी चौथ्या फेरीअखेर पिछाडीवर राहिले आहेत.

Parner Constituency Election Results: Nilesh Lanke leads the way | पारनेर मतदारसंघ निवडणूक निकाल : निलेश लंके यांची आघाडी कायम

पारनेर मतदारसंघ निवडणूक निकाल : निलेश लंके यांची आघाडी कायम

googlenewsNext

पारनेर : पारनेर विधानसभा मदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी ९ हजार ३१६ मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे उमेदवार विजय औटी चौथ्या फेरीअखेर पिछाडीवर राहिले आहेत.
    निलेश लंके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरीतही त्यांनी ९ हजार ३१६ मतांची आघाडी घेतली आहे. निवडणूक प्रचारातही मोठी चुरस होती. येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली होती.

शिवसेनेतून फुटून लंके राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांनी दोन ते तीन वर्षापासून ते मतदारसंघात तरुणांची मोट बांधत होते. गावोगावी त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठाणच्या शाखा उघडून तरुणांंचे संघटन उभारले. याशिवाय सुजित झावरे वगळता राष्ट्रवादीचे इतर नेतेही एकत्र आले होते. त्याचा फायदाही लंके यांना होताना दिसत आहे. सेनेचे विजय औटी हे पारनेरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. 

Web Title: Parner Constituency Election Results: Nilesh Lanke leads the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.