नेवासा फाटा येथे ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरचे चाक फुटून झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:37 PM2017-12-13T12:37:39+5:302017-12-13T13:18:08+5:30

One killed, one injured in accident on a truck carrying cane transportation at Nevasa Phata | नेवासा फाटा येथे ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरचे चाक फुटून झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी

नेवासा फाटा येथे ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरचे चाक फुटून झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी

Next

नेवासा फाटा : नेवाशाकडून - नेवासा फाट्याकडे डब्बल ट्रॉलीतून ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील एकजण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान मुळा पाटबंधारे कार्यालयासमोर घडली.
या अपघातातील जखमी प्रदीप नवले (वय २५) हा श्रीरामपूर येथील असल्याचे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. तर मयताची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर नेवासा फाटा येथे वाहतूक कोंडी झाली. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करुन अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात नेले. यातील मयताची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Web Title: One killed, one injured in accident on a truck carrying cane transportation at Nevasa Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.