स्थायी समितीवर जुन्याचीच वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 05:00 PM2019-02-23T17:00:33+5:302019-02-23T17:01:05+5:30

महापालिकेच्या स्थायी समितीवर राष्ट्रवादीसह, सेना, भाजप आणि काँग्रेसने कारभाराचा अनुभव असलेल्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे़ नव्याने निवडून येणाºयांना स्थायी समिती सदस्य होण्याची आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़

Old age on standing committee | स्थायी समितीवर जुन्याचीच वर्णी

स्थायी समितीवर जुन्याचीच वर्णी

Next

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीवर राष्ट्रवादीसह, सेना, भाजप आणि काँग्रेसने कारभाराचा अनुभव असलेल्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे़ नव्याने निवडून येणाºयांना स्थायी समिती सदस्य होण्याची आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी व महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठीची सभा शुक्रवारी पार पडली़ सभेला उपमहापौर मालन ढोणे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, नगरसचिव एस़ बी़ तडवी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते़ सभेच्या सुरुवातीलाच सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या सदस्यांची संख्या सांगण्यात आली़ त्यानुसार सर्वप्रथम गटनेत्यांकडून स्थायी समिती सदस्यांची यादी बंद पाकिटात मागविण्यात आली़ राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी स्थायी समितीवर नियुक्त करावयाच्या सदस्यांची नावे दिली़ ती महापौर वाकळे यांनी सभागृहात वाचून दाखविली़ राष्ट्रवादीकडून स्थायी समितीच्या सदस्यपदी अविनाश घुले, गणेश भोसले, दीपाली बारस्कर, कुमार वाकळे, शोभा बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी बंद पाकिटात सदस्यांची नावे दिली़ सेनेकडून योगिराज गाडे, गणेश कवडे, सुभाष लोंढे, अमोल येवले, सुवर्णा जाधव, विद्या खैरे यांची निवड करण्यात आली आहे़ भाजपकडून स्थायी समितीसाठी नगरसेविका आशा कराळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर यांना संधी देण्यात आली आहे़ काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांनी दिलेल्या बंद पाकिटात नगरसेविका संध्या पवार यांचे नाव निघाले़ बसपाचे गटनेते मुद्दसर शेख यांची स्थायीवर वर्णी लागली आहे़ राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजप आणि काँग्रेसकडून जुन्या जाणत्यांनाच संधी देण्यात आली आहे़ निवडणुकीनंतर प्रथमच स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली़
सर्वच राजकीय पक्षांतील नगरसेवकांना स्थायीवर जाण्याची संधी मिळणार आहे़ पण, पहिल्यांदा महापालिकेच्या कारभाराचा अनुभव असणाºयांना संधी देण्यात आली आहे़

महिला बालकल्याण समिती सदस्य
 भाजप- लता शेळके, गौरी नन्नवरे, सोनाबाई शिंदे
शिवसेना- रिता भाकरे, कमल सप्रे, पुष्पा बोरुडे, सुवर्णा ग्यानप्पा, सुनीता कोतकर, मंगल लोखंडे
राष्ट्रवादी- ज्योती गाडे, मीना चव्हाण, परवीन कुरेशी, मीना चोपडा, शोभा बोरकर,
बसपा-अनिता पंजाबी, काँग्रेस- रिजवाना शेख
सेनेकडून महापौर लक्ष्य
सभेच्या सुरुवातीलाच सेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी महापौरांवर तोफ डागत अंदाजपत्रक महासभेत घेऊन त्यास मंजुरी घेण्याची मागणी केली़

Web Title: Old age on standing committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.