नगर मनपा निवडणूक २०१८ : राष्ट्रवादीत तेच चेहरे की नव्यांना संधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:28 PM2018-11-06T12:28:09+5:302018-11-06T12:28:12+5:30

भाजप-सेनेचा मुकाबला करायचा असेल तर राष्टÑवादीला शहरातील तेच ते चेहरे बाजूला करत नवीन चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागेल असा एक मतप्रवाह पक्षात आहे.

Nagar municipal election 2018: NCP's opportunity to face the same nawabs? | नगर मनपा निवडणूक २०१८ : राष्ट्रवादीत तेच चेहरे की नव्यांना संधी ?

नगर मनपा निवडणूक २०१८ : राष्ट्रवादीत तेच चेहरे की नव्यांना संधी ?

Next

अण्णा नवथर
अहमदनगर : भाजप-सेनेचा मुकाबला करायचा असेल तर राष्टÑवादीला शहरातील तेच ते चेहरे बाजूला करत नवीन चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागेल असा एक मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात अनेकजण आरोपी असल्याने प्रचारात तो मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे पक्ष अशा कार्यकर्त्यांच्या उमेदवारीबाबत सावध आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत़ पक्षाकडे अर्ज देण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर आहे़ गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या १८ आहे़ यावेळी ती दुप्पट करण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे़ उमेदवारी देताना निवडून येण्याचा एकमेव निकष असेल़
प्रभाग क्रमांक एक मधून नगरसेवक संपत बारस्कर पुन्हा मैदानात उतरले आहेत़ पण,जोडीला कोण असेल, याची त्यांना चिंता आहे. निर्मलनगर परिसरातील प्रभाग २ मध्ये राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही़ येथे माजी नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे इच्छुक आहेत़ मुकुंदनगरमधील प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही़ परंतु, आमदार जगताप समर्थक माजी नगरसेवक संजय गाडे इच्छुक आहेत़ तारकपूरमधील प्रभाग ४ मध्ये माजी नगरसेविका इंदरकौर गंभीर व अजिंक्य बोरकर यांनी तयारी सुरू केली आहे़ या प्रभागातून गतवेळी पराभूत झालेले एक कामगार ठेकेदार उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. परंतु त्यांचा प्रभागात प्रभाव नाही. बोरकर हेही गतवेळी पराभूत झालेले असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह आहे. प्रोफेसर चौक भागातील प्रभाग ५ मध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर उमेदवारी करतील़ पण, त्यांच्या जोडीला पक्ष कोणता उमेदवार देणार, याची त्यांना चिंता आहे़ बालिकाश्रम रोड भागातील प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही़ या प्रभागातून माजी नगरसेवक दगडू पवार यांचे नाव आहे. परंतु येथे भाजप, सेनेशी कडवा मुकाबला आहे. त्यामुळे पक्ष तरुण चेहºयांच्या शोधात दिसतो.
बोल्हेगाव भागातील प्रभाग ७ मध्ये कुमारसिंह वाकळे विद्यमान नगरसेवक आहेत़ या भागातून गतवेळी राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले होते़ त्यापैकी दत्ता सप्रे सेनेच्या तंबूत दाखल झाले. येथे माजी नगरसेवक पोपटराव बारस्कर राष्ट्रवादीकडून पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग आठ मधूनही माजी नगरसेवक अरविंद शिंदे प्रचाराला लागले आहेत़ सिध्दार्थनगरसह प्रभाग नऊ मधून नावेच समोर आलेली नाहीत.
सर्जेपुरामधील प्रभाग दहा मध्ये आरिफ शेख राष्ट्रवादीकडून दोनवेळा निवडून आलेले आहेत़ दोनदा संधी दिल्याने येथे पक्ष नवीन चेहºयाचा विचार करत आहे. मध्यवर्ती शहरात प्रभाग ११ मध्ये कापडबाजार, हातमपुरा भागात अविनाश घुले पक्षाकडून पुन्हा मैदानात उतरु शकतात. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. या प्रभागात इतर उमेदवार अनिश्चित आहेत. माळीवाडा भागातील प्रभाग १२ मध्ये सेना- भाजपाचे मातब्बर उमेदवार असल्याने राष्ट्रवादीला तोडीसतोड उमेदवार द्यावे लागणार आहेत़ तेथेही घुलेंच्या नावाचा विचार सुरु आहे. नालेगावमधील प्रभाग १३ मध्येही राष्ट्रवादीचा विद्यमान नगरसेवक नाही़ त्यामुळे तेथे नवीन चेहरे समोर येऊ शकतात. सारसनगरमधील प्रभाग १४ मध्ये आमदार संग्राम जगताप स्वत: व त्यांच्या पत्नी शीतल जगताप विद्यमान नगरसेविका आहेत.
संग्राम यांनी नगरसेवकपद सोडले नाही. या प्रभागातून जगताप कुणाला उमेदवारी देतात, याची उत्सुकता आहे़ रेल्वेस्टेशन भागातील प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादीचे विजय गव्हाळे व आशा पवार, हे दोघे नगरसेवक आहेत़ येथून निलेश बांगरेही इच्छुक
दिसतात. जुन्यांना सांभाळायचे व पक्षाच्या प्रतिमेसाठी नवीन चेहºयांना संधी द्यायची हा पेच पक्षासमोर
आहे.
जुने नगरसेवकच उमेदवारीचे पुन्हा दावेदार
यापूर्वी नगरसेवक पद भूषविलेले अनेक जुणे चेहरेच राष्टÑवादीकडे पुन्हा उमेदवारी मागत आहेत. त्याच त्या उमेदवारांना संधी दिल्यास पक्षात नवीन चेहरे कसे समोर येणार? हा मोठा प्रश्न पक्षासमोर आहे. जुन्यांना पुन्हा संधी दिल्यास अनेक नवीन कार्यकर्ते निराश होण्याचा धोका आहे. त्यामुळे पक्षासमोर पेचप्रसंग आहे.

 

Web Title: Nagar municipal election 2018: NCP's opportunity to face the same nawabs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.