मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत पाहिला नाही- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 12:23 PM2019-02-04T12:23:27+5:302019-02-04T12:27:43+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे.

MNS chief Raj Thackeray criticize Narendra Modi | मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत पाहिला नाही- राज ठाकरे

मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत पाहिला नाही- राज ठाकरे

Next
ठळक मुद्देमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान राज ठाकरेंनी अण्णांचं म्हणणं जाणून घेतले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत बघितला नसल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. 

अहमदनगर- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी अण्णांचं म्हणणं जाणून घेतले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाणा साधला आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सत्तेत आले आहेत. निर्दयी सरकारसाठी जिवाची बाजी लावू नका, मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत बघितला नसल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. 

नरेंद्र मोदी या माणसावर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका. केवळ अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच मोदी आणि त्यांचे सहकारी आज सत्तेवर बसले आहेत.  तसेच पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरही त्यांनी टीका केली आहे. सीबीआय विरुद्ध पोलीस हा प्रकार भयानक आहे. सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर मोदी सरकार नियंत्रण ठेवू पाहत आहे. अण्णांमुळे केजरीवाल जगाला माहिती झाले, आज ते केजरीवाल अण्णांना भेटायलादेखील येत नाहीत. 

कॉंग्रेस सरकार सत्तेत असताना ‘लोकपाल’ कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली होती. १८ डिसेंबर २०१३ रोजी जेव्हा ‘लोकपाल’चे बिल राज्यसभेत मंजूर झाले त्यावेळी मोदी यांनी ‘टि्वट’ करून आनंद व्यक्त केला होता. ‘लोकपालचे बिल पास होणे हा अण्णांची जिद्द व त्यांच्या मेहनतीचा एक प्रकारे सन्मान आहे. त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा’ असे ते या टि्वटमध्ये म्हणाले होते.‘लोकपाल’चे बिल मंजूर करण्यासाठी सुषमा स्वराज व अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या खासदारांनी सकारात्मक भूमिका पार पाडली, त्याबद्दल मला अभिमान आहे’, असेही टि्वट त्यांनी केले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अण्णा हजारे यांची प्रशंसा करणारी भाषणे केली होती.




 

Web Title: MNS chief Raj Thackeray criticize Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.