घरात घुसून अल्पवयीन मुलीच्या विनयभंग; आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 05:12 PM2019-05-16T17:12:28+5:302019-05-16T17:13:20+5:30

अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना घरात घुसून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी

Minor girl molested in the house; 3 years of strict wages for the accused | घरात घुसून अल्पवयीन मुलीच्या विनयभंग; आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

घरात घुसून अल्पवयीन मुलीच्या विनयभंग; आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

googlenewsNext

नेवासा : अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना घरात घुसून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी उमेश अहिलाजी गायकवाड (रा. शिंगवे तुकाई ता. नेवासा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांनी दोषी धरून त्याला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारपक्षाच्या वतीने अति.सरकारी वकिल अ‍ॅड. देवा काळे यांनी काम पाहिले.
अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबीयासोबत तिच्या नातेवाईकांच्या गावी आलेली होती. ती सायंकाळी घरामध्ये झोपलेली असतांना आरोपी याने घरात घुसुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सन २०१५ मध्ये सोनई पोलीस स्टेशन येथे विनयभंग तसेच बालकाचे लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.त्यावर तपासी अधिकारी पो.हे.कॉ.जब्बार पठाण यांनी सदर गुन्हयाचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यामध्ये सरकारपक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी धरून त्यास बालकाचे लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७ व ८ नुसार ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड.देवा काळे यांनी काम पाहिले. त्यांना पो. कॉ. गणेश अडागळे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Minor girl molested in the house; 3 years of strict wages for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.