'लग्न त्यांच्या घरातलं नाही, मग ते नाचतंय का?' आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:14 PM2019-04-19T18:14:07+5:302019-04-19T18:15:42+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहत आहेत.

'Marriage is not in their house, so does they dance?' Raj Thackeray's reign by prakash Ambedkar | 'लग्न त्यांच्या घरातलं नाही, मग ते नाचतंय का?' आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

'लग्न त्यांच्या घरातलं नाही, मग ते नाचतंय का?' आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

Next

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांवरुन त्यांना लक्ष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या सभा म्हणजे, लग्न कोणाचं हे नाचतंय होणासाठी ? असा थेट सवाल आंबेडकर यांनी विचारला आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात नाही. मग, राज ठाकरे कोणासाठी सभा घेतायंत? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. 

अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांना राज ठाकरेंच्या सभा आणि भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर कडक शब्दात टीका केली. ''लग्न त्यांच्या घरातलं नाही, मग ते नाचतंय का? हेच मला कळत नाही. आपल्या स्वत:च्या घरातय, मग आनंदय म्हणून आपण नाचतो. आता, हे त्यांच्या घरात लग्न नाही. मग, हे नाचतंय कोणासाठी, हे तर त्यांनी सांगाव?'' अशा शब्दात प्रकाश आंबडेकरांनी राज ठाकरेंच्या सभांचा समाचार घेतला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहत आहेत. यातच महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आणखी जोरात तापू लागलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमधून व्हिडीओ दाखवत भाजपावर टीका करताना मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना पाहायला मिळत आहेत. यातून सोशल मिडीयावर देखील लाव रे तो व्हिडीओ हे राज ठाकरेंचे वाक्य जोरदार धुमाकूळ घालतंय. त्यावर, प्रकास आंबेडकर यांनी टीका केली आहे. तसेच, पंतप्रधान मोदींवरही आंबेडकर यांनी टीका केली. मोदीजी तुम्ही स्वत:ला मागासवर्गीय म्हणता, मग त्यांच्यासाठी काय केलं ते सांगा शिवाय स्वत:चे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढून जाहीर करावे, म्हणजे सर्वांना कळेल की तुम्ही मागासवर्गीय आहात की नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
 

Web Title: 'Marriage is not in their house, so does they dance?' Raj Thackeray's reign by prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.