मांडवे अत्याचारातील आरोपी ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 03:45 AM2017-07-24T03:45:32+5:302017-07-24T03:45:32+5:30

पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तिसगाव येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून,

Mandriva accused of torture in CCTV! | मांडवे अत्याचारातील आरोपी ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद!

मांडवे अत्याचारातील आरोपी ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तिसगाव येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे़
अल्पवयीन मुलीला दुचाकीवर तिसगावच्या दिशेने घेऊन येत असलेला इसम स्पष्टपणे सीसीटीव्हीत दिसत असल्याने पोलिसांना या फुटेजची मोठी मदत होणार आहे़
मांडवे येथून तिसगाव येथे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीला शुक्रवारी सकाळी एका मोटारसायकलवरील इसमाने गाडीवर नेले. मुलीवर मांडवे ते तिसगाव दरम्यानच्या रस्त्यावर अत्याचार केला़ मुलीने ही घटना तिसगाव येथील नागरिकांना सांगितल्यानंतर प्रकरण समोर आले़ घटनेनंतर पाथर्डी व तिसगाव येथे नागरिकांनी आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी केली़ एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये आरोपी दुचाकीवर अल्पवयीन मुलीला घेऊन येताना दिसत आहे़ अत्याचार करणारा हाच आरोपी असल्याचे निश्चित झाले.

अधीक्षकांनी घेतला आढावा
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी रविवारी मांडवे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला़ अधिकाऱ्यांशी चर्चा करत तपासाचा आढावा घेतला़ घटनेमुळे तिसगाव परिसरातील खेड्यापाड्यांमधून शाळेत येणाऱ्या मुलींमध्ये घबराट पसरली आहे़

Web Title: Mandriva accused of torture in CCTV!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.