जलयुक्त अभियानातून गावे जलस्वयंपूर्ण करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

By साहेबराव नरसाळे | Published: July 13, 2023 07:23 PM2023-07-13T19:23:51+5:302023-07-13T19:24:20+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन, जलशक्ती अभियान व अमृत सरोवर या योजनांची आढावा बैठक झाली.

make villages water independent through jalyukta campaign said collector siddharam salimath | जलयुक्त अभियानातून गावे जलस्वयंपूर्ण करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

जलयुक्त अभियानातून गावे जलस्वयंपूर्ण करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

googlenewsNext

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळून पीक उत्पादन वाढीसाठी जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याबरोबरच निवडलेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.  

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन, जलशक्ती अभियान व अमृत सरोवर या योजनांची आढावा बैठक झाली. बैठकीत जलशक्ती अभियानाच्या माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. बैठकीला समितीचे सदस्य पद्मश्री पोपटराव पवार, उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या बाबींना प्राधान्य देण्यात यावे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आहेत. या सर्व योजना या गावांमध्ये राबविण्यात येऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा. गावामध्ये फेरफारची प्रलंबितता, शेतरस्ते मोकळे करणे, गावांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सोलारचा वापर, प्रत्येक गाव कचरामुक्त व हागणदारीमुक्त करणे यासह इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून निसर्गपुरक गावे निर्माणावर अधिक भर द्यावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

१६६ ठिकाणी अमृत सरोवरची कामे

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अमृत सरोवर व जलशक्ती अभियानाचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प प्राधान्याने राबविण्यात यावा. जिल्ह्यात ११६ ठिकाणी अमृत सरोवरची कामे सुरु असून ही कामे गुणवत्तापूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

विकासात्मक धोरणामध्ये जिल्ह्याचा मोलाचा वाटा - पद्मश्री पोपटराव पवार

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, जलसंधारणांच्या कामांमध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याची गरज असुन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये एनएसएस व एनसीसी विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरेल. योजनेसाठी निधीची कमतरता नसून कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याची आवश्यकता आहे.

257 गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करा

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील 257 गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करण्याबरोबरच कामासंदर्भात असलेल्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन बाबतची माहिती गावामध्ये होणाऱ्या ग्रामसभांमधुन प्रत्येक गावकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केल्या.

Web Title: make villages water independent through jalyukta campaign said collector siddharam salimath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.