मढेवडगांवच्या टँकरला मिळाले लॉगबुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 06:37 PM2019-05-14T18:37:09+5:302019-05-14T18:53:45+5:30

१० मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठा करणा-या टँकरचे ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशन केले.

Longbucks got a tanker at Mhedwadgaon | मढेवडगांवच्या टँकरला मिळाले लॉगबुक

मढेवडगांवच्या टँकरला मिळाले लॉगबुक

Next

मढेवडगांव : १० मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठा करणा-या टँकरचे ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशन केले. त्यामुळे अनियमितता आणि बेजबाबदारपणे चाललेल्या कारभारामुळे टँकर ठेकेदारांचे व प्रशासनाचे धाबे दणाणले. अनियमितता दूर करण्यासाठी धावाधाव करून नियमांप्रमाणे कृतीत येण्याचे टँकर चालकांना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले गेले.
पंचायत समितीने पंधरा दिवसांपासून लॉगबुकच दिले नसल्याचे आढळून आले होते. टँकरला फलकही लावला जात नव्हता. तर महिलांच्या सह्या साध्या वहीवर घेतल्या जात होत्या. स्टिंग आॅपरेशनचा जबरदस्त परिणाम होऊन अधिका-यांनी टँकर चालकाला लॉगबुक तातडीने दिले. फलक लावण्याचे सक्त आदेश दिले.

मढेवडगांव येथील टँकरला लॉगबुक दिले असून फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.- प्रशांत काळे, गटविकास अधिकारी

आम्हाला तातडीने लॉगबुक देण्यात आले. नियमांचे पालन करण्याचा सूचना दिल्या. माझा टँकर कंपनी मार्फत सुरू आहे. - गणेश उंडे, टँकर चालक

Web Title: Longbucks got a tanker at Mhedwadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.