विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 03:37 PM2018-10-30T15:37:43+5:302018-10-30T15:37:58+5:30

तालुक्यातील उंचखडक बुद्रूक शिवारात देशमुखवाडीत एका विहिरीत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या पडला होता.

Livelihood lying in the well | विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

Next

अकोले : तालुक्यातील उंचखडक बुद्रूक शिवारात देशमुखवाडीत एका विहिरीत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या पडला होता. गावकऱ्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी तातडीने लाकडी पलंग (बाज) विहिरीत सोडली, नंतर रात्री दोनच्या सुमारास वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून त्यास जेरबंद करत सुगाव रोपवाटिकेत सरकारी पाहुणचारासाठी आणले आहे.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जयवंत देशमुख आपल्या वस्तीवरील घरामागे विहिरीवर विद्युतपंप चालू करण्यास गेले होते. त्यांच्या शेतीपंपाचा पाईप हालत असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावले तर बिबट्या पाईपला धरण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी शेजारील शेतकºयांना ही बाब सांगितली. लगेच बिबट्याला वाचवण्यासाठी गावकºयांनी दोरीने बाज पाण्यात सोडली. बिबट्या बाजेवर बसला आणि नाड्याने वर चढण्याचा प्रयत्न करूलागला पण ते त्याला शक्य झाले नाही. विहिरीच्या जाईच्या आधारावर तो बसून राहिला. वनविभागाला ही बाब कळवण्यात आली. वनविभागाचे १०-१२ कर्मचारी लागलीच दाखल झाले. त्यांनी रात्री दोन वाजता विहिरीत पिंजरा सोडला. बिबट्या त्यात अडकल्यावर पिंजरा बाहेर काढण्यात आला. बिबट्याला वनविभागाच्या सुगाव रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. येत्या चार ते सहा दिवसांनी त्यास योग्य ठिकाणी जंगलात सोडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले यांनी सांगितले.
 

Web Title: Livelihood lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.