गोठ्यात घुसलेल्या बिबट्याचा गायींच्या प्रतिहल्ल्यात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 13:13 IST2019-01-13T13:06:47+5:302019-01-13T13:13:13+5:30

शिकारीसाठी गायींच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बिबट्यावर गायींनी प्रतिहल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.  

Leopard death in cows attack in ahmednagar | गोठ्यात घुसलेल्या बिबट्याचा गायींच्या प्रतिहल्ल्यात मृत्यू

गोठ्यात घुसलेल्या बिबट्याचा गायींच्या प्रतिहल्ल्यात मृत्यू

ठळक मुद्दे शिकारीसाठी गायींच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बिबट्यावर गायींनी प्रतिहल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.  गोठ्यात असलेल्या तीस ते पस्तीस गायींनी  प्रतिकार  केल्याने गायींच्या पायाखाली तो तुडवला गेला.

आश्वी - शिकारीसाठी गायींच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचामृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बिबट्यावरगायींनी प्रतिहल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.  

संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापूर शिवारातील कार परिसरातील सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या गट नंबर 182 मधील घराशेजारी असलेल्या गायींच्या गोठ्यात शनिवारी (12 जानेवारी) रात्री ही घटना घडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात दीड वर्षाच्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत एका गायीवर हल्ला केला. मात्र यावेळी गोठ्यात असलेल्या तीस ते पस्तीस गायींनी  प्रतिकार  केल्याने गायींच्या पायाखाली तो तुडवला गेला. गाय व बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Leopard death in cows attack in ahmednagar