चुलीत गेले नेते.. खड्ड्यात गेला पक्ष...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 03:38 PM2018-08-25T15:38:01+5:302018-08-25T15:38:07+5:30

तालुक्यातील आंबड गावच्या प्रवेशद्वाराजवळ ‘चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष...जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मंत्री, आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढाºयाला गावात प्रवेश नाही’ असा फलक लावून मराठा आरक्षण मागणीचा आवाज गावातील तरुणाईने उठविला आहे.

The leader went to the jungle. The party went to the pit ...! | चुलीत गेले नेते.. खड्ड्यात गेला पक्ष...!

चुलीत गेले नेते.. खड्ड्यात गेला पक्ष...!

googlenewsNext
ठळक मुद्देआंबडच्या तरुणाईचा आवाज : मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी

अकोले: तालुक्यातील आंबड गावच्या प्रवेशद्वाराजवळ ‘चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष...जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मंत्री, आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढा-याला गावात प्रवेश नाही’ असा फलक लावून मराठा आरक्षण मागणीचा आवाज गावातील तरुणाईने उठविला आहे.
तालुक्यातील सर्वपक्षाच्या पुढाºयांना आबंडच्या तरुणाईच्या या अभिनव आंदोलनास सामोरे जावे लागणार असून याचा फटका गावातील स्थानिक पुढाºयांनाही सहन करावा लागणार आहे.आंबडकर तरुणांनी हा फलक लावला असून याच गावाचे पुढारी गिरजाजी जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी पुढारी म्हणून गावात न येता गावकरी म्हणून गावात यावं, ते जर पुढारी-नेते म्हणून गावात आले तर निषेध करु, असे दत्ता जाधव या तरुणाने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

 

Web Title: The leader went to the jungle. The party went to the pit ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.