दिवाळीच्या ‘लक्ष्मी’साठी आंध्र प्रदेशातून झावळ्या, पारंपरिक व्यवसाय अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 05:46 AM2018-11-06T05:46:52+5:302018-11-06T05:47:17+5:30

यंदा दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. याचा परिणाम दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात महत्त्वाचे स्थान असलेल्या लक्ष्मी (झाडणी) बनविण्याच्या व्यवसायावर झाला आहे.

For the 'Lakshmi' festival of Diwali, a brawl from Andhra Pradesh, a traditional business problem | दिवाळीच्या ‘लक्ष्मी’साठी आंध्र प्रदेशातून झावळ्या, पारंपरिक व्यवसाय अडचणीत

दिवाळीच्या ‘लक्ष्मी’साठी आंध्र प्रदेशातून झावळ्या, पारंपरिक व्यवसाय अडचणीत

googlenewsNext

- बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा (जि.अहमदनगर) -  यंदा दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. याचा परिणाम दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात महत्त्वाचे स्थान असलेल्या लक्ष्मी (झाडणी) बनविण्याच्या व्यवसायावर झाला आहे. ही लक्ष्मी बनविण्यासाठी लागणारी शिंदाडाची झाडे महाराष्ट्रात दुर्मीळ झाली आहेत. परिणामत: शिंदाडाच्या झावळ्या आंध्रप्रदेशातून आणाव्या लागल्याने बाजारपेठेत लक्ष्मीचा भाव वधारला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात वडाळी, कोळगाव, लोणी व्यंकनाथ येथे लक्ष्मी बनविणारे कारागीर आहेत. दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी लागणारी लक्ष्मी बनविणे हा मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय होता. पूर्वी मातंग समाजात घरोघर लक्ष्मी तोरण बनविले जात होते. दसऱ्याला आंब्याच्या पानाचे तोरण व दिवाळीला शेतकरी व व्यापाºयांना लक्ष्मी दिली जाते. त्या मोबदल्यात शेतकरी, व्यापारी कारागिरांना धान्य मिठाई देत असत, त्याला आसामी असे म्हणत.
अलिकडच्या काळात आसामी संपल्यावर सर्व व्यवहार पैशावर सुरू झाला. दिवाळी अगोदर दोन महिन्यांपासून लक्ष्मी बनविण्यास जास्त गती येते. पण पाणी टंचाईमुळे शिंदाडाची झाडे नष्ट झाली. त्यामुळे मातंग समाजाचा घरोघरचा लक्ष्मी बनविण्याचा व्यवसाय अस्तंगत होऊन आता त्याला व्यावसायिक स्वरुप आले आहे.

व्यवसाय परवडत नाही
पूर्वी गावात ओढ्याला शिंदाडाची झाडे होती. त्यामुळे लक्ष्मी बनविण्यासाठी गावातच पाने मोफत उपलब्ध होत होती. गेल्या काही वर्षांपासून शिंदाडाची झाडे संपली आहेत. त्यामुळे आंध्रप्रदेशातून ही पाने आणावी लागतात. हा व्यवसाय परवडत नाही. पण काटकसर करून वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करावा लागतो.
- बाळासाहेब काळे, कोळगाव.

Web Title: For the 'Lakshmi' festival of Diwali, a brawl from Andhra Pradesh, a traditional business problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.