राहुल फटांगडेच्या मारेक-यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 08:15 PM2018-01-10T20:15:50+5:302018-01-10T22:32:50+5:30

कोरेगाव-भीमा, सणसवाडी (ता. शिरूर) येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाच्या मारेक-यांना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथून पोलिसांनी अटक केली.

Koregaon- Bhima gang-rape arrested three youths at Paragaon Sudirik | राहुल फटांगडेच्या मारेक-यांना अटक

राहुल फटांगडेच्या मारेक-यांना अटक

googlenewsNext

पुणे : कोरेगाव-भीमा, सणसवाडी (ता. शिरूर) येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाच्या मारेक-यांना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये तिघांचा समावेश असून, पैकी दोन अल्पवयीन आहेत.

कोरेगाव-भीमा आणि परिसरात झालेल्या दंगलीत राहुल फटांगडे (वय ३०, रा. कान्हुरमेसाई, सध्या रा. सणसवाडी) या तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुलचा खून झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने व्हिडीओ फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, मोबाईल ड्रम डाटा, सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास करून अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील तिघांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने व्हिडीओ फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, मोबाईल ड्रम डाटा, सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास करून अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील अक्षय आल्हाट याच्यासह इतर दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Web Title: Koregaon- Bhima gang-rape arrested three youths at Paragaon Sudirik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.