कोपर्डीतील आरोपींची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:35 AM2017-08-18T05:35:35+5:302017-08-18T05:35:38+5:30

कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांच्यासह पाच जणांची साक्ष नोंदविण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली़ या खटल्याची पुढील सुनावणी जिल्हा न्यायालयात ३० आॅगस्ट रोजी होणार आहे़

Kopardi's plea rejected by the accused | कोपर्डीतील आरोपींची याचिका फेटाळली

कोपर्डीतील आरोपींची याचिका फेटाळली

Next

अहमदनगर : कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांच्यासह पाच जणांची साक्ष नोंदविण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली़ या खटल्याची पुढील सुनावणी जिल्हा न्यायालयात ३० आॅगस्ट रोजी होणार आहे़
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ याच्यावतीने अ‍ॅड़ बाळासाहेब खोपडे यांनी अ‍ॅड़ निकम यांच्यासह टीव्हीवरील बातम्यांची सीडी तयार करून देणारे रवींद्र चव्हाण, वैद्यकीय अधिकारी राजेंद्र थोरात, पत्रकार उदय निरगुडकर, नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेचे व्यवस्थापक आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी अशा सहा जणांची साक्ष घेण्याची मागणी केली होती़ ही मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळली होती़ याविरोधात अ‍ॅड़ खोपडे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती़ खंडपीठाने सहापैकी केवळ रवींद्र चव्हाण यांची साक्ष घेण्यास परवानगी दिली़ खंडपीठाच्या निकालाविरोधात बचाव पक्षाने १४ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली़
दरम्यान, या खटल्यात जिल्हा न्यायालयात गुरुवारी रवींद्र चव्हाण यांची साक्ष नोंदविण्यात येणार होती़ मात्र ते आजारी असल्याचा अर्ज दाखल झाल्याने पुढील सुनावणी ३० आॅगस्ट रोजी होणार आहे़
>खटला अंतिम टप्प्याकडे
कोपर्डी खटल्यात सरकारी पक्षाची साक्षीदारांची यादी संपली असून, आतापर्यंत एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत़ आरोपी पक्षाच्या वतीने आता एक साक्षीदार तपासण्यात येणार आहे़

Web Title: Kopardi's plea rejected by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.