खर्डा येथे चोरट्यांचा धुमाकुळ तीन दुकाने फोडली

By admin | Published: July 5, 2017 02:09 PM2017-07-05T14:09:09+5:302017-07-05T14:09:09+5:30

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे बुधवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी रविवार पेठेत धुमाकुळ घातला.

At Kharda, the smugglers smashed three shops | खर्डा येथे चोरट्यांचा धुमाकुळ तीन दुकाने फोडली

खर्डा येथे चोरट्यांचा धुमाकुळ तीन दुकाने फोडली

Next



जामखेड (अहमदनगर) :  जामखेड तालुक्यातील खर्डा येथे बुधवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी रविवार पेठेत धुमाकुळ घातला. भूषण प्रदीप शहा यांचे होलसेल किराणा मालाचे दुकान फोडून गल्ल्यातील तीन ते चार हजार रुपये चोरुन नेले. त्यानंतर जवळीलच ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्थेवर चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला. पतसंस्थेचे शटर लोखंडी रॉडने तोडले. यावेळी आवाज झाल्याने पतसंस्थेच्या दुस-या मजल्यावर झोपलेले कुटुंब जागे झाले. जामखेड रोडवरील हणुमंत कातोरे यांचे हार्ड वेअर दुकान फोडुन तीन हजार चोरुन नेहले. शेख सलीम गफुर हे जागे झाल्याने पतसंस्थेची मोठी हानी टळली. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

Web Title: At Kharda, the smugglers smashed three shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.