केडगाव हत्यांकाडात आमदार संग्राम जगतापांविरोधात पुरावा नाही : सीआयडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:47 AM2018-07-18T11:47:03+5:302018-07-18T11:47:48+5:30

केडगाव हत्याकांडप्रकरणी ४३ दिवसांच्या तपासात आमदार संग्राम जगतापसह बाळासाहेब कोतकर यांच्या विरोधात आम्हाला अद्यापपर्यंत काहीच पुरावा मिळाला नाही.

Kedgaon assassination: There is no evidence against MLA Sangram Jagtap: CID | केडगाव हत्यांकाडात आमदार संग्राम जगतापांविरोधात पुरावा नाही : सीआयडी

केडगाव हत्यांकाडात आमदार संग्राम जगतापांविरोधात पुरावा नाही : सीआयडी

Next

अहमदनगर : केडगाव हत्याकांडप्रकरणी ४३ दिवसांच्या तपासात आमदार संग्राम जगतापसह बाळासाहेब कोतकर यांच्या विरोधात आम्हाला अद्यापपर्यंत काहीच पुरावा मिळाला नाही. त्यामुळेच त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले नाही, असे स्पष्टीकरण मंगळवारी सीआयडीच्या तपासी अधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालयात सादर केले आहे.
केडगाव हत्याकांडाबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ६ जुलै रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांनी अटक केलेल्या भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, नगरसेवक विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाळासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप ऊर्फ जॉन्टी बाळासाहेब गि-हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. तर कलम १७३ (८) प्रमाणे तपासाचा हक्क कायम ठेवून आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांचे नाव वगळले. न्यायालयाने सीआयडीच्या अधिका-यांना नोटीस काढून जगताप व कोतकर यांची नावे दोषारोपपत्रातून का वगली, याबाबत विचारणा करत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Kedgaon assassination: There is no evidence against MLA Sangram Jagtap: CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.