नोकरीच्या आमिषाने ठकबाजी

By admin | Published: May 25, 2014 11:55 PM2014-05-25T23:55:48+5:302014-05-26T00:23:28+5:30

अहमदनगर : एका आॅईल कंपनीमध्ये नोकरी लावून देतो म्हणून एका तरुणाची अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job bait cheat | नोकरीच्या आमिषाने ठकबाजी

नोकरीच्या आमिषाने ठकबाजी

Next

अहमदनगर : एका आॅईल कंपनीमध्ये नोकरी लावून देतो म्हणून एका तरुणाची अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील भातोडी जवळील पारेवाडी येथील सुभाष मनीराम शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी फिर्याद दिली आहे. मुलाला नोकरी लावून देतो म्हणून विश्वजित रमेश कासार (रा. वाळकी)याने शिंदे यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. ओएनजीसी या आॅईल कंपनीमध्ये नोकरीला लावण्याबाबत शिंदे यांना कासार याने आश्वासन दिले. त्यानंतर शिंदे हे कासार यांच्याशी वारंवार संपर्क साधून नोकरीविषयी चौकशी करीत होते. यासाठी कासार हे शिंदे यांना मुंबई येथे घेऊन गेले. काही कंपन्याही दाखविल्या. पंधरा दिवसांमध्ये रुजू होण्याबाबतचे पत्र मिळेल, असेही आश्वासन मिळाले. पंधरा दिवसानंतर कोणतेही पत्र न मिळाल्याने शिंदे यांनी कासार यांच्याशी वाद घातला. त्यावेळी कासार याने पाच लाख रुपयांपैकी अडिच लाख परत दिले. उर्वरित अडिच लाख रुपयांसाठी शिंदे यांनी कासार यांच्याकडे अनेकवेळा खेटे घातले. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कासार याच्याविरुद्ध विश्वासघात करणे, फसवणूक करणे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराज रंजवे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Job bait cheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.