जिल्हा परिषदेच्या १४ शिक्षकांना करणे दाखवा नोटिस : आॅनलाईन बदली प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 05:40 PM2018-09-27T17:40:10+5:302018-09-27T17:49:32+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या होऊनदेखील शिक्षक त्याच शाळेवर काम करत असून, जिल्ह्यातील १४ शिक्षकांना शिक्षण विभागाने कारणे दाखवाना नोटिस बजावली आहे. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी हजर न होणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

 The grower of the 14th Finance Commission of the Gram Panchayats | जिल्हा परिषदेच्या १४ शिक्षकांना करणे दाखवा नोटिस : आॅनलाईन बदली प्रक्रिया

जिल्हा परिषदेच्या १४ शिक्षकांना करणे दाखवा नोटिस : आॅनलाईन बदली प्रक्रिया

Next

अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या होऊनदेखील शिक्षक त्याच शाळेवर काम करत असून, जिल्ह्यातील १४ शिक्षकांना शिक्षण विभागाने कारणे दाखवाना नोटिस बजावली आहे. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी हजर न होणा-या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जूनमध्ये राज्यस्तरावरून आॅनलाईन बदल्या झाल्या. बदलीच्या ठिकाणी शिक्षक हजर होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला.  असे असले तरी जिल्ह्यातील १४ शिक्षक त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. त्यांना वेळोवेळी सूचना देऊनदेखील  सदर शिक्षक त्यांच्या पूर्वीच्याच शाळेत काम पाहत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आपणास निलंबित का करण्यात येऊ नये, अशा अशाच्या नोटिसा बजावल्या आहेत. नोटिशीव्दारे त्यांना सात दिवसांत खुलासा मागविला होता. परंतु, अद्याप एकही शिक्षकाने शिक्षण विभागाकडे खुलासा दिलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.  
आॅनलाईन बदली करताना शिक्षकांकडून २० पर्याय भरून घेण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एका शाळेवर त्यांची आॅनलाईन बदली करण्यात आली. परंतु, स्वत: पर्याय देऊनही १४ शिक्षक बदली झालेल्या शाळेवर हजर झाले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर न झाल्यास शिक्षकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करावी, असे शिक्षण खात्याचे निर्देश आहेत.
हजर न झाल्यास शिक्षकांवर कडक कारवाई
आॅनलाईन बदली झालेल्या शाळेवर हजर न झाल्यास शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षकांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येते़ ही पळवाट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सर्वांना नोटिसा मिळाल्या किंवा नाही, याची खात्री केली असून, त्यांना खुलासा सादर करण्यासाठी काही दिवसांचा आवधी दिला आहे.

Web Title:  The grower of the 14th Finance Commission of the Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.