सरकारी उद्योग मोडीत घालण्याचा घाट - रंजन दाणी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 06:18 PM2018-02-25T18:18:27+5:302018-02-25T18:18:27+5:30

 The government's disenchantment ghat - the rendition of Ranjan Dane | सरकारी उद्योग मोडीत घालण्याचा घाट - रंजन दाणी यांचे प्रतिपादन

सरकारी उद्योग मोडीत घालण्याचा घाट - रंजन दाणी यांचे प्रतिपादन

googlenewsNext
ठळक मुद्दे राळेगणसिध्दीत भारत संचारची राज्यस्तरीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू पहात होत्या. म्हणून त्या कंपन्यांचे सरकारीकरण झाले. पंडित नेहरू सरकारी उद्योगांना मंदिरे म्हणत असत. ही आधुनिक भारताची मंदिरे सध्याच्या सरकारने उध्वस्त करायला घेतलीय की काय? असा सवाल एनएफटीइ संघटनेचे परिमंडल सचिव कॉ. रंजन दाणी यांनी केला.
नॅशनल फेडरेशन आॅफ टेलिकॉम एम्लॉईज संघटनेच्या महाराष्ट्र परिमंडल कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक रविवारी राळेगण सिद्धी येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉ. हरीष मोक्ताली, औरंगाबादचे मु्ख्यव्यवस्थापक अरविंद वडनेरकर, व्यवस्थापक अमन जायस्वाल होते. अध्यक्षस्थानी कॉ. विजय बांडी होते.
दाणी म्हणाले, सर्वाधिक पगार आणि सर्वाधिक पेन्शन घेणारा कर्मचारी बीएसएनएलचा आहे आणि हे कॉ. ओ.पी. गुप्ता या कर्मयोग्याचे देणे आहे. गेल्या दोन वर्षांचा बोनस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. चंदेश्वर सिंग यांनी फायद्याचे कलम वगळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि त्यांच्या कार्यालयाने त्याची दखल घेतली. पुढील महिन्यात अमृतसर येथे संघटनेचे राष्ट्रिय अधिवेशन असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र सामिल व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. अमन जायस्वाल म्हणाले, औद्योगिक कलह आणि शांती विशद करताना सर्वांनीच आधी संवाद करावा आणि मगच कायदा पाहावा. कुणाही कर्मचा-याची अन्यायकारक बदली होऊ नये. तसा अन्याय होत असेल तर प्रशासन पीडिताच्या पाठीशी असेल. अरविंद वडनेरकर यांनी तिसरा वेतन करार हा मुद्दा नसून चौथा किंवा पाचवा वेतन करार हा मुद्दा आहे असल्याचे सांगील्यावर टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. फोरजी साठी बीएसएनएल प्रयत्न करत असल्याचे सांगून या नंतर टेलीकॉम सेक्टरमध्ये केवळ चार आॅपरेटर राहतील, असा दावा त्यांनी केला.
बैठकीस सरपंच रोहिणी गाजरे, कॉ. विजय पिंपरकर, कॉ. प्रदीप जाधव, कॉ. विजय शिपनकर, कॉ. सुनिता पाटील, कॉ. रमेश शिंदे, कॉ. सुनिल धर्माधिकारी, कॉ. शिरीष अकोलकर, कॉ. भाऊ खाकाळ, कॉ. व्हि.एस हंपे, कॉ. अशोक पिल्ले, कॉ. गोरख अकोलकर, रोहिदास पठारे उपस्थित होते. सूत्रसंचालन कॉ. अशोक हिंगे यांनी केले. काँ. त्रिंबक दुधाडे यांनी आभार मानले.

 

  • अस्तित्वाची चिंता नको
  • भारत संचारचा मार्केट शेअर पंधरा ते वीस टक्के राहिला तरी बावीस हजार कोटीचा व्यवसाय होईल एवढी प्रचंड क्षमता आपल्यात असल्याने कंपनीच्या अस्तित्वाची चिंता करु नका, परंतु त्यासाठी आपणाला सातत्यपुर्ण प्रयत्न करावे लागतील, असा सल्ला अरविंद वडनेरकर यांनी दिला.

Web Title:  The government's disenchantment ghat - the rendition of Ranjan Dane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.