कोपरगावात धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 04:44 PM2018-08-24T16:44:55+5:302018-08-24T16:44:59+5:30

शहरातून कोपरगाव तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समजाच्या वतीने मेंढ्यासह पारंपारिक पद्धतीने जागरण गोंधळ करत शहरातील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्याचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले.

Front for reservation of Dhangar community in Kopargaon | कोपरगावात धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा 

कोपरगावात धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा 

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदारांना दिले विविध मागण्याचे निवेदन  

कोपरगाव : शहरातून कोपरगाव तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समजाच्या वतीने मेंढ्यासह पारंपारिक पद्धतीने जागरण गोंधळ करत शहरातील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्याचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले.
  तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील धनगर समाजातील बांधवानी शुक्रवारी सकाळी शहरातून भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती तत्काळ लागू कराव्यात. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव द्यावे. काळानुरूप बंद पडत असलेल्या मेंढ्या चारण्याच्या व्यवसायाला राखीव कुरण मिळावे. आंदोलनांमधील धनगर आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे. आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या धनगर बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
     यावेळी विजय वहाडणे, शरद खरात, संजय कांबळे, प्रकाश करडे, शिवाजी कवडे, दीपक कांदळकर, योगेश नरोडे, रमेश टिक्कल, राजेंद्र टिक्कल, बापूसाहेब शिंदे, शिवाजीराव शेंडगे, ज्ञानेश्वर गोंधळे, प्रभाकर शिंदे, सचिन कोळपे यांनी भाषणे केली. विविध संघटनाच्या वतीने धनगर समाजाच्या मागणीला पाठींबा दिला. या निवेदनावर प्रभाकर शिंदे, राजेंद्र नावडकर, किरण थोरात, सचिन कोळपे, जालिंदर चितळकर, विलास कोळपे, बाबासाहेब पानसरे, अशोक काकडे, आशिष वाघमारे, पंकज जाधव, अशोक मतकर, दत्तात्रय बढे, गणेश करडे, नंदू बडे, जालिंदर शेळके, भाऊसाहेब शेळके, ज्ञानेश्वर कोळपे, आशिष वाघमारे, शिवाजीराव शेंडगे, ज्ञानेश्वर गोंधळे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Front for reservation of Dhangar community in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.