पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Published: October 28, 2014 12:19 AM2014-10-28T00:19:50+5:302014-10-28T01:00:52+5:30

पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाचा विविध संघटनांनी मोर्चा, गावबंद आदी आंदोलनांमधून निषेध नोंदविला़ तसेच या हत्याकांडाला आठवडा उलटला

Front of police protest | पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा

पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा

Next


पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाचा विविध संघटनांनी मोर्चा, गावबंद आदी आंदोलनांमधून निषेध नोंदविला़ तसेच या हत्याकांडाला आठवडा उलटला तरी आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले नाही़ त्यामुळे विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पाथर्डी शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ तेथे झालेल्या निषेध सभेत पोलिसांच्या तपासाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली़
मिरी येथे निषेध
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याच्या घटनेचा मिरी ग्रामपंचायतीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, आरोपींना अटक करुन कडक शिक्षा करण्याची मागणी सरपंच मिना मिरपगार यांनी केली आहे़ आठवडा उलटला तरी अद्याप या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही़ पोलिसांनी वेगाने तपास करुन आरोपींना अटक करावी, अशी मागणी सरपंच मिरपगार, उपसरपंच बाबासाहेब गवळी, रमेश मिरपगार, बंडोपंत झाडे, नारायण सोलाट, एकनाथ झाडे, आदीनाथ वाघ आदींनी केली आहे़
श्रीगोंद्यात मोर्चा
श्रीगोंदा : पाथर्डी तालुक्यातील दलित हत्याकांड प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा अन्यथा नवीन सरकारचा शपथविधी दिन काळा दिवस पाळण्याचा इशारा श्रीगोंद्यातील दलित नेत्यांनी दिला आहे. सोमवारी दलित बांधवांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध केला. जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबियांच्या नातेवाईकांना २५ लाखाची मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डी. एम. भालेराव, मल्हारराव घोडके, जालिंधर घोडके, टिळक भोस, सुरेश सुडगे, जीवा घोडके, सुनील घोडके यांची भाषणे झाली. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी राजेंद्र नागवडे, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब शेलार, केशव मगर, शहानुर अत्तार, प्रशांत दरेकर, दादा औटी, फक्कड मोटे आदी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Front of police protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.