पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवेत गोळीबार : मुलगा मृत्यमुखी, वडील जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 03:52 PM2018-11-24T15:52:57+5:302018-11-24T15:53:12+5:30

पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवे शिवारात पुर्ववैमन्यासातून झालेल्या गोळीबारात एकजण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे

Firing in Kamtshwa of Pathardi taluka: The boy died, his father was injured | पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवेत गोळीबार : मुलगा मृत्यमुखी, वडील जखमी

पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवेत गोळीबार : मुलगा मृत्यमुखी, वडील जखमी

googlenewsNext

मिरी : पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवे शिवारात पुर्ववैमन्यासातून झालेल्या गोळीबारात एकजण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. योगेश एकनाथ जाधव(वय-२५) या मृत्यू झाला असून एकनाथ जाधव हे जखमी झाले आहेत. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
पोपट गणपत आदमाने याने कामतशिंगवे शिवारात स्वत:च्या रायफलीमधून योगेश एकनाथ जाधव(वय-२५) व एकनाथ जाधव यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये योगेश एकनाथ जाधव हा जागीच ठार झाला तर वडील एकनाथ जाधव जखमी झाले. गोळीबार झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी पोपट गणपत आदमाने यास अटक केली आहे. आदमाने सैन्यदलातून सेवानिवृत्त असून त्याला मिळालेल्या बंदुकीतून त्याने हा गोळीबार केला.

Web Title: Firing in Kamtshwa of Pathardi taluka: The boy died, his father was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.