Father-son crushed water | पिता-पुत्राला पाण्याच्या टँकरने चिरडले
पिता-पुत्राला पाण्याच्या टँकरने चिरडले

अहमदनगर : मुलाला शाळेत सोडविण्यासाठी चाललेल्या पित्यासह मुलाला भरधाव वेगातील टँकरने चिरडले. या दोघांचाही जाग्यावरच मृत्यू झाला. सतिष कसबे व सौरव सतिष कसबे असे ठार झालेल्या पिता- पुत्राचे नाव आहे.
सतिष विठ्ठल कसबे दुचाकीवरून नववीत शिकणा-या सौरवला शाळेत सोडवण्या ााठी चालले होते. सुपा-आपधूप रोडवरील सबस्टेशनच्या जवळ पाणी भरण्यासाठी येत असलेल्या टँकरने पिता पुत्रांना चिरडले. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

 


Web Title: Father-son crushed water
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.