भरपाईसाठी शेतक-यांनी रस्त्याचे काम रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:45 PM2017-09-01T16:45:43+5:302017-09-01T16:46:08+5:30

तालुक्यातून जाणा-या पैठण-पंढरपूर पालखी महामार्गामुळे बाधित होणा-या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिला.

Farmers stopped the road work to compensate | भरपाईसाठी शेतक-यांनी रस्त्याचे काम रोखले

भरपाईसाठी शेतक-यांनी रस्त्याचे काम रोखले

Next
कमत न्यूज नेटवर्कशेवगाव : तालुक्यातून जाणा-या पैठण-पंढरपूर पालखी महामार्गामुळे बाधित होणा-या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिला. शेतक-यांना भरपाई न देता मनमानी पद्धतीने सुरु असलेले हे काम हर्षदा काकडे, शिवाजीराव काकडे व बाधित शेतक-यांनी बंद पाडले. लाडजळगाव (ता.शेवगाव ) येथे पैठण-पंढरपूर महामार्गाचे विभागीय अभियंता सूर्यकांत गलांडे यांना याप्रश्नी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे व जि.प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. अभियंता गलांडे, ठेकेदार व बाधित शेतकºयांची संयुक्त बैठक होऊन याप्रश्नी चर्चा झाली. लाडजळगाव ते शेकटे खुर्द या रस्त्याची यावेळी पाहणी करण्यात आली. अ‍ॅड. काकडे म्हणाले, महामार्गाचे काम सुरू करताना ज्या शेतक-यांची जमीन, घरे, विहिरी, झाडे बाधित होत आहेत. त्यांना रितसर नोटीस दिलेल्या नाहीत. तसेच अधिग्रहणाच्या सूचना दिलेल्या नाहीत. कोणत्या गावातील, गट नंबरमधील किती क्षेत्र बाधित आहे याची माहिती शेतक-यांना दिलेली नाही. काही शेतकरी व गरिबांची राहती घरे, गावठाण हद्दीतील घरे, टप-या, दुकाने रोजच्या कमाईचे साधनेच नष्ट होण्याचा धोका असून शेतक-यांवर उपासमारीची वेळ येईल. अगोदरच दुर्गम, दुष्काळी व विकासापासून वंचित असलेल्या या भागातील शेतकºयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. रस्त्यामुळे बाधितांना पुर्वसूचना व नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. शासनाकडून याबाबत योग्य कार्यवाही होऊन शेतक-यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा काकडे यांनी दिला. यावेळी लाडजळगाव गटाच्या जि. प. सदस्या हर्षदा काकडे, सरपंच बाळासाहेब तहकीक, अंबर बर्डे, भाऊसाहेब बर्डे, संजय आंधळे, बप्पासाहेब बर्डे, राजेंद्र मराठे, उद्धव बर्डे, बाबा अडसरे, कालिदास ढाकणे, एकनाथ ढाकणे, भाऊसाहेब राठोड, जनाभाऊ वावरे, बाळासाहेब बर्डे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers stopped the road work to compensate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.