समशेरपूर येथे पाण्यासाठी शेतक-यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:29 PM2018-02-15T12:29:49+5:302018-02-15T12:30:11+5:30

अकोले तालुक्यातील सांगवी धरणातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी अधिका-यांनी बंद केल्यामुळे समशेरपूर व सावरगाव येथील शेतक-यांनी आज, गुरुवारी सकाळी समशेरपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले.

Farmers' Rationale for water in Samsarpur | समशेरपूर येथे पाण्यासाठी शेतक-यांचा रास्तारोको

समशेरपूर येथे पाण्यासाठी शेतक-यांचा रास्तारोको

googlenewsNext

समशेरपूर : अकोले तालुक्यातील सांगवी धरणातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी अधिका-यांनी बंद केल्यामुळे समशेरपूर व सावरगाव येथील शेतक-यांनी आज, गुरुवारी सकाळी समशेरपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले.
सांगवी धरणातून समशेरपूर, सावरगाव परिसरातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेतक-यांची पिके निघतील अशी आशा होती. मात्र, हे पाणी अचानक बंद करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, गुरुवारी सकाळी ९ वाजता समशेरपूर फाटा येथे शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनात परिसरातील सर्वपक्षीय नेते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Web Title: Farmers' Rationale for water in Samsarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.