अहमदनगरमधील खड्डेमय निंबळक बायपासवरील फेसबुक लाइव्ह आंदोलनास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:18 PM2017-12-02T12:18:33+5:302017-12-02T12:26:14+5:30

अहमदनगरमधील खड्डेमय झालेल्या निंबळक बायपासबाबत नगरमधील दोनशे ते तीनशे तरुणांनी एकत्र येत फेसबुक लाइव्ह आंदोलन सुरु केले आहे

The Facebook Live movement on the patchy Nimbalak Bypass in Ahmednagar began | अहमदनगरमधील खड्डेमय निंबळक बायपासवरील फेसबुक लाइव्ह आंदोलनास सुरुवात

अहमदनगरमधील खड्डेमय निंबळक बायपासवरील फेसबुक लाइव्ह आंदोलनास सुरुवात

Next
ठळक मुद्दे दोनशे युवकांचा सहभागखासदारांच्या घरासमोर करणार अंत्यविधी

नागेश सोनवणे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अहमदनगरमधील खड्डेमय झालेल्या निंबळक बायपासबाबत नगरमधील दोनशे ते तीनशे तरुणांनी एकत्र येत फेसबुक लाइव्ह आंदोलन सुरु केले आहे. अहमदनगर- मनमाड हायवेवरील विळद येथील बायपास येथून हे आंदोलन सुरु करण्यात आले असून निंबळक चौकामार्गे कल्याण महामार्र्गावर आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून खड्डेमय झालेला बायपास त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच अपघातामधील मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर करणार असल्याची भुमिका या युवकांनी घेतली आहे.

नगर शहरातील युवकांनी एकत्र येत हे लाइव्ह आंदोलन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरु केले आहे. प्रत्येक युवकाच्या फेसबुक पेजवरुन हे आंदोलन लाइव्ह केले जात आहे. लाइव्हच्या माध्यमातून रस्त्याची दुरवस्था सरकारला दाखविण्याचा युवकांचा प्रयत्न आहे. बायपासबाबत वेळोवेळी आंदोलन करुनही सरकार दखल घेत नाही. त्यामुळे अवजड वाहने नगर शहरातून जात असल्याने अपघात होत आहेत. बायपास दुरुस्त झाल्यास अवजड वाहने शहरातून जाणार नाहीत. पर्यायाने शहरामध्येही वाहतूक कोंडी होणार नाही. बायपासवरील खड्ड्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. सरकारला जाग येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनाही हे लाइव्ह आंदोलन दाखविण्यात येणार आहे. अपघातामधील मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार खासदारांच्या घरासमोर आंदोलक करणार आहेत. या आंदोलनात कॉम्रेड बहीरनाथ वाकळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले आहेत.

Web Title: The Facebook Live movement on the patchy Nimbalak Bypass in Ahmednagar began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.