काढ्याचा अति व चुकीचा वापर आरोग्यास धोकादायक; डॉ. सिमरन वधवा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 03:14 PM2020-08-30T15:14:57+5:302020-08-30T15:15:48+5:30

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक व घरच्या घरी तयार केलेला काढा अत्यंत उपयुक्त आहे. मात्र त्याचा अतिरेकी व चुकीचा वापर धोकादायक आहे, असा इशारा येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सिमरन वधवा यांनी दिला आहे. 

Excessive and improper use of extract is dangerous to health; Dr. Opinion of Simran Wadhwa | काढ्याचा अति व चुकीचा वापर आरोग्यास धोकादायक; डॉ. सिमरन वधवा यांचे मत

काढ्याचा अति व चुकीचा वापर आरोग्यास धोकादायक; डॉ. सिमरन वधवा यांचे मत

Next

संडे स्पेशल मुलाखत 

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अति काढा घेतल्याने अनेकांना इतर आजारांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर लोकमतने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सिमरन वधवा यांच्याशी संवाद साधला. 

काढा कसा केला जातो?

डॉक्टर- आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी स्वच्छ पाणी, तुळशीची पाने, लवंग, काळी मिरी, छोटी विलायची, आले, मसाला इलायची, गवती चहा, पुदिना, गूळ आवश्यक आहेत. अश्वगंधा, गिलॉय आणि कळमेघ पावडरचा वापर काढयामध्ये करावा. सर्व प्रथम पाणी गरम करा. पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यावर चवीनुसार मीठ, लवंग, मिरपूड, इलायची, आले आणि गूळ घाला. थोड्या वेळाने तुळशीची पाने आणि चहाची किंवा गवती चहाची पाने घाला. चहाची पाने व पाणी अर्धा राहिले की गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे इतर काही उपाय?

डॉक्टर- रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी कोमट पाण्याचा रस, आवळा, कोरफड, गिलॉय, लिंबू इत्यादींचा रस प्यावा. तुळशीच्या रसातील काही थेंब पाण्यात टाकणे किंवा कोमट दुधात हळद मिसळून प्यावे. तुळशीची पाने, चार काळी मिरी, तीन लवंग, एक चमचा आल्याचा रस मधाबरोबर घेता येतो. तुळशीची १०-१५ पाने, ७ काळी मिरी, थोडी दालचिनी आणि  आले, चहा देखील वापरता येतो. 

काढा किती फायदेशीर?

डॉक्टर- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे.  एकाच वेळी बºयाच विकारांमध्ये काढा काम करेल. प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पौष्टिक आहार. नैसर्गिक पौष्टिक घटकांपासून तयार केलेला काढा आरोग्यास अनेक फायदे पुरवतो. सर्दी, खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी देखील काढा प्रभावी आहे. तापामुळे शरीरात येणारा अशक्तपणा देखील यामुळे बरा होतो.

अतिसेवनाचे परिणाम

काढा उबदार आणि गरम असल्याने अतिसेवनामुळे समस्या वाढवतो. काढा बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सर्व गोष्टी उष्ण परिणाम देतात. अतिसेवनामुळे अंगावर फोड येणे, आंबटपणा, घशात जळजळ होऊ शकते.  काळी मिरी आणि दालचिनीचे जास्त सेवन केल्याने ओटीपोटात वेदना होऊ शकते. गिलॉय, मुलेथी आणि अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधांचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो. योग्य गुणोत्तर महत्वाचे आहे. प्रत्येक साहित्य योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. 

Web Title: Excessive and improper use of extract is dangerous to health; Dr. Opinion of Simran Wadhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.