अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 08:01 AM2018-10-22T08:01:24+5:302018-10-22T09:58:40+5:30

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

eight killed in road accident on Ahmednagar-Pune highway | अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

googlenewsNext

पळवे - अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा येथे सोमवारी (22 ऑक्टोबर) पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात घडला.

औरंगाबादहुन पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने  हा अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रामेश्वर वाकचौरे (27), मुबशीर अहमद शेख (29), अश्विनी सुभाष कुलकर्णी (23), सायली कुलकर्णी (24), प्रिया सुनील पाटील (24), मृणाल दिवानजी (25), अतिष पांडुरंग गुरव (24), शितल पांडुरंग गुरव (26), वैजनाथ भास्कर सानप (28), हनुमंत विश्वनाथ राख (20), मनोज शंकर माने (40), उमेश सोनाजी गलांडे (20) ही अपघातातील जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.

 

Web Title: eight killed in road accident on Ahmednagar-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.