मुळा धरणातील पाणीसाठा खपाटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:28 PM2018-05-29T17:28:30+5:302018-05-29T17:28:30+5:30

सलग दोन वर्ष मुळा धरण भरूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणात के वळ २ हजार २०० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. 

Dust water storage in Mula dam | मुळा धरणातील पाणीसाठा खपाटीला

मुळा धरणातील पाणीसाठा खपाटीला

googlenewsNext

राहुरी : सलग दोन वर्ष मुळा धरण भरूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणात के वळ २ हजार २०० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. 
२६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ७ हजार ००० दलघफु पाणी साठा उपलब्ध आहे. त्यापैकी ४ हजार ५०० दलघफु पाणी मृत स्वरूपात आहे.  याशिवाय पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी शेवटचे अवर्तन १ हजार ६५२ क्युसेकसने सुरू आहे. डाव्या कालव्यातुन २८० क्युसेकसने पाण्याचे अवर्तन शेतीसाठी सुरू आहे. मुळा धरण धरण गेल्या दोन वर्षात पुर्ण क्षमतेने भरल्याने नदी पात्रातुन पाणी सोडण्यात आले होते. दोन्ही कालव्यातून शेतीसाठी मुबलक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. जुलै महीन्यापर्यंत पिण्यासाठी पुरेल इतके पाणी धरणात शिल्लक आहे. जुलैच्या पहील्या आठवड्या मुळा धरणाकडे पाणी आवक सुरू होते. धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर दरवर्षी त्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत येतात. यंदाही पाणी खाली गेल्यानंतर पिण्याच्या पाणी योजना अडचणीत येऊ लागल्या आहेत.

 

Web Title: Dust water storage in Mula dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.