कोरडगावात घर कोसळले : आजी - नातू जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 02:46 PM2018-08-22T14:46:21+5:302018-08-22T14:46:23+5:30

चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी कोरडगाव (ता.पाथर्डी) येथे दशरथ भानुदास काकडे यांचे जूने घर कोसळले. या दुर्घटनेत काकडे यांच्या पत्नी चंद्रकला व नातू अजिंक्य असे दोघे गंभीर जखमी झाले.

Due to collapse of house in Kadagga | कोरडगावात घर कोसळले : आजी - नातू जखमी

कोरडगावात घर कोसळले : आजी - नातू जखमी

googlenewsNext

कोरडगाव : चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी कोरडगाव (ता.पाथर्डी) येथे दशरथ भानुदास काकडे यांचे जूने घर कोसळले. या दुर्घटनेत काकडे यांच्या पत्नी चंद्रकला व नातू अजिंक्य असे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
गेल्या चार दिवसांपासून कोरडगाव व परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या जून्या माळवदाच्या घरावर पाणी साचून गळती लागली होती. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास चंद्रकला (वय ५५) व त्यांचा नातू अजिंक्य (वय ४ वर्षे) हे त्यांच्या सहा खणांच्या घरात चहा पित बसले होते. अचानक घराचा वरचा भाग कोसळून त्याखाली आजी व नातू दबले गेले. प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांच्या मदतीने अर्धा तासानंतर दोघांनाही ढिगाºयाखालून बेशुध्दावस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने अहमदनगरला हलविण्यात आले आहे. खासगी रूग्णालयात दोघांवर औषधोपचार सुरू आहेत. महसूल विभागाचे मंडळाधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
 

Web Title: Due to collapse of house in Kadagga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.