शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू : नेवासा तालुक्यातील झापवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 03:14 PM2019-03-06T15:14:09+5:302019-03-06T17:34:38+5:30

नेवासा तालुक्यातील झापवाडी येथील शेतकरी रवींद्र बबनराव जरे (वय-४५) आणि ज्योती रवींद्र जरे (वय-४३) या शेतकरी दापत्यांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला.

Death of husband and wife due to sinking in farmland: Jhapwadi incidents in Nevada taluka | शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू : नेवासा तालुक्यातील झापवाडीतील घटना

शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू : नेवासा तालुक्यातील झापवाडीतील घटना

Next


सोनई : झापवाडी (ता. नेवासा) येथील शेतकरी रवींद्र बबनराव जरे (वय ४५) व पत्नी ज्योती रवींद्र जरे (वय -४३) या शेतकरी दांपत्यांचा दुदेर्वी मृत्यू झाला. शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. लोहगाव शिवारात मंगळवार (दि.५) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.  
बुधवारी सकाळी मुलगा व सुन घरात नसल्यामुळे शोधाशोध करण्यात आली. यावेळी शेततळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल. शेततळ्याच्या काठावरती चप्पल, टॉर्च आढळून आले. तसेच रस्सीचे एक टोक पाण्यात तर दुसरे टोक काठावर आढळले. मुलगा रवींद्र व सून ज्योती हे मंगळवारी  रात्री पाणी देण्यासाठी शेतात गेल्याचे वडील बबनराव जरे यांनी पोलीस जबाबात म्हटले आहे. लोहगावचे पोलीस पाटील सोपान ढेरे यांच्या फिर्यादीवरून  सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
त्यांच्या पश्चात वडील बबनराव जरे,आई हिराबाई, मुलगा हर्षवर्धन व मुलगी हर्षदा असा परिवार आहे. हर्षवर्धन हा इयत्ता अकरावीमध्ये शिकत असून मुलगी हर्षदा ही पुणे येथे शिक्षणासाठी आहे.
बुधवारी दुपारी चार वाजता झापवाडी येथिल जरे वस्तीवर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


 

Web Title: Death of husband and wife due to sinking in farmland: Jhapwadi incidents in Nevada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.