दलित संघटनाचा शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:19 PM2018-01-04T15:19:09+5:302018-01-04T15:21:07+5:30

कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अजय साळवे व सुनील क्षेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 The Dalit organization on Friday slammed the municipal office of the District Collector's office | दलित संघटनाचा शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

दलित संघटनाचा शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

Next

अहमदनगर : कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अजय साळवे व सुनील क्षेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोर्चात छावा व मराठा महासंघ सहभागी होणार असून, हा मोर्चा कुठल्याही जाती विरोधात नही. कोरेगाव-भीमा प्रकरणावरुन मराठा व दलितांमधे फुट पडणा-या मनुवाद्यांविरोधात हा मोर्चा असल्याचे साळवे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस अनंत लोखंडे, जयंत गायकवाड, नाना पटोले, सुरेश बनसोडे, रोहित आव्हाड, नितीन कसबेकर आदी उपस्थित होते.

Web Title:  The Dalit organization on Friday slammed the municipal office of the District Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.