टाकळी ढोकेश्वरमध्ये कॉपी पुरविणारांची परिक्षा केंद्रावर दगफफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 08:13 PM2018-03-22T20:13:28+5:302018-03-22T20:37:26+5:30

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर आज कॉपी पुरविणारांनी आज दगडफेक केली.

Dagfhek at the examination center for providing copies of the Tuckeshwar Dokshwar | टाकळी ढोकेश्वरमध्ये कॉपी पुरविणारांची परिक्षा केंद्रावर दगफफेक

टाकळी ढोकेश्वरमध्ये कॉपी पुरविणारांची परिक्षा केंद्रावर दगफफेक

Next

पारनेर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर आज कॉपी पुरविणारांनी आज दगडफेक केली. दहावीचा पेपर सुरु होण्या अगोदर एका टोळक्याने शिक्षकांच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी केंद्रचालक श्रीधर बाबासाहेब झावरे यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (दि.२२) मार्च रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत इयत्ता दहावीचा माहिती संप्रेशन तंत्रज्ञानचा (आयटीसी) शेवटचा पेपर होता. यावेळी सकाळी ११.३० वाजता या माध्यमिक शाळेतील शिक्षक सुनील कारभारी वाव्हळ (रा- जाधवनगर, कल्याण रोड, अहमदनगर) यांच्या वाहनाची (क्रमांक एम.एच- १६ आर २१९९) ड्राईव्हरसाईडच्या दोन्ही काचा व पाठीमागील मोठी काच दगडांच्या साहाय्याने टिल्या थोरात (रा. टाकळी ढोकेश्वर) याने फोडली आहे तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पाच ते सहा जणांनी याच विद्यालयातील सेमिनार हॉलच्या दरवाजाची तोडफोड करण्यात केली तसेचइमारतीच्या काचाही दगडाने फोड ल्या आहेत.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार अनिल भोसले करत आहे.

Web Title: Dagfhek at the examination center for providing copies of the Tuckeshwar Dokshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.