गृहउपयोगी वस्तू खरेदीसाठी ‘किचन प्लास्ट’ मध्ये गर्दी

By admin | Published: October 19, 2016 12:41 AM2016-10-19T00:41:19+5:302016-10-19T01:03:29+5:30

अहमदनगर : सर्व प्रकारच्या गृहउपयोगी वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात आणि त्याही माफक दरात, अशी महिलांची अपेक्षा होती़ ती ‘किचन प्लास्ट’च्या रूपाने पूर्ण झाली़

Crowds in 'Kitchen Plast' for Buying Home Appliances | गृहउपयोगी वस्तू खरेदीसाठी ‘किचन प्लास्ट’ मध्ये गर्दी

गृहउपयोगी वस्तू खरेदीसाठी ‘किचन प्लास्ट’ मध्ये गर्दी

Next


अहमदनगर : सर्व प्रकारच्या गृहउपयोगी वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात आणि त्याही माफक दरात, अशी महिलांची अपेक्षा होती़ ती ‘किचन प्लास्ट’च्या रूपाने पूर्ण झाली़ गेल्या वर्षभरापूर्वी निर्माण झालेल्या ‘किचन प्लास्ट’ या स्टील आणि प्लास्टीक वस्तूंच्या दालनात सध्या दसरा-दिवाळी खरेदी महोत्सव सुरू असल्याने गृहउपयोगी वस्तू खरेदीसाठी गर्दी होत, असल्याची माहिती संचालिका वैशाली योगेश मुनोत यांनी दिली़
शहरातील मुख्य बाजारपेठेला लागून असलेल्या वसंत टॉकिज रोडवरील ‘किचन प्लास्ट’ हे दालन आहे़ गजबजलेल्या शहरातील या दालनासमोर प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असल्याचे सांगून वैशाली मुनोत म्हणाल्या, पती योगेश मुनोत हे फर्टीलायझर, बारदाना व्यावसायिक आहेत़ पूर्वीपासून त्यांना व्यवसायात हातभार लावत असे़ पण स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, असे वाटत असे़ त्यामुळे वर्षभरापूर्वी ‘किचन प्लास्ट’या गृहउपयोगी वस्तूंचे दालन सुरू केले़ प्लास्टीक आणि स्टीलच्या वस्तू मिळण्याचे नगर शहरातील एकमेव दालन आहे़
वर्षभरही विविध वस्तू खरेदीसाठी महिलांची रेलचेल किचन प्लास्ट मध्ये असते़ परंतु सणासुदीच्या दिवसात अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळतो़ स्टिल आणि प्लास्टीकच्या वस्तूंच्या असंख्य व्हरायटी, माफक दर व नवनवीन उत्पादने असल्याने ग्राहक येथे येतात़ सध्या या दालनामध्ये दसरा-दिवाळी खरेदी महोत्सव सुरू आहे़ या महोत्सवात बक्षीस योजना सुरू आहे़ नॅनो कार, बुलेट, टीव्ही, फिज, वॉशिंग मशीन अशी अनेक बक्षिसे ग्राहकांसाठी आहेत़ खरेदी केलेल्या वस्तूंवर १० ते २५ टक्क्यांपर्यंत सवलतही देण्यात आलेली असल्याचे वैशाली मुनोत यांनी सांगितले़
किचन प्लास्ट मध्ये नामांकित अ‍ॅक्शनवेअर, महानंदा, अ‍ॅरीस्टो, नयासा, अ‍ॅटलस व इतर कंपन्यांची उत्पादने उपलब्ध आहेत़ यात डस्टबीन, बादली, मग, टब, बकेट मॉप, प्लास्टीक झाडू, शुरॅक, बाथरूम सेट तसेच किचन मध्ये वापरण्यासाठी वेजीटेबल कटर, फाईन इन कटर, ज्युसर, ग्लास स्टँड, कंटेनर, पेटजार, लंचबॉक्स अशा दैनंदिन वापरातील भरपूर वस्तूू महिलांना आकर्षित करत आहे़ या दालनात दिवाळीनिमित्त ड्रायफ्रू ट बॉक्स आणि पॅकिंग गिफ्ट आर्टिकल्स उपलब्ध असल्याच मुनोत यांनी सांगितले़ (वा. प्ऱ)

Web Title: Crowds in 'Kitchen Plast' for Buying Home Appliances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.