मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांवर संकट

By admin | Published: October 2, 2014 11:48 PM2014-10-02T23:48:46+5:302014-10-02T23:51:05+5:30

नेवासा/अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे शेतकरी हिताविरुद्ध चाललेल्या सरकारला जनतेने शिकवलेला धडा आहे.

Crisis on farmers due to Modi government | मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांवर संकट

मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांवर संकट

Next

नेवासा/अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे शेतकरी हिताविरुद्ध चाललेल्या सरकारला जनतेने शिकवलेला धडा आहे. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारी सत्ता आणि सत्ताधारी नकोत हाच संदेश त्यातून जनतेने दिला आहे. कांदा, कापूस, डाळिंबावरील निर्यात बंदी करून आणि साखर निर्यातीवरील अनुदान थांबवून केंद्र सरकारने चार महिन्यातच शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. उभ्या आयुष्यात छत्रपतींची शिवजयंती साजरी केली का? असा सवाल भाजपाला करून आज छत्रपतींच्या नावाने मते मागता असा टोलाही लगावला.
घोडेगाव (ता.नेवासा) येथील बाजार समिती उपआवारात राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख व नगर येथे संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
आजचे केंद्रातील मोदी सरकार गरिबांचा विचार करायलाच तयार नसल्याचा आरोप करतत्यामुळे राज्याच्या हिताची जपवणूक करणारे कणखर सरकार राष्ट्रवादीच देऊ शकते असे ते म्हणाले. पवारांनी कांद्याच्या भावाला हात घालत कांद्याचे भाव वाढले की दिल्लीत दंगा होतो पण बाटली बंद शुद्ध पाण्यासाठी २० रुपये घालतात तर कांद्यामागे ७५ पैसे जास्त मिळाले तर गोंधळ का करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
घोडेगावात पवार म्हणाले, मला राज्यात जे घडवायचे मनात होते त्याची पूर्तता आमदार शंकरराव गडाख यांनी या मतदारसंघात करून दाखवली. त्यामुळे काम करणाऱ्याला मते मागायला मी आलो आहे.
नगर येथील सभेत ते म्हणाले, येथील सेनेच्या आमदाराने जातीय द्वेष निर्माण केला. उद्योग व्यवसायाची अडवणूक केली. त्यामुळे विकास खुंटला. नगरचे हे तण उपटून टाका, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी पाचपुतेंवर टीका केली.
घोडेगावच्या सभेत प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व आमदार शंकरराव गडाख, विठ्ठलराव लंघे यांची यावेळी भाषणे झाली.
नगरच्या सभेत दादा कळमकर यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर पिचड, शंकरराव घुले, आमदार अरुण जगताप, बाळासाहेब बोराटे, किरण काळे, शारदा लगड होते. या सभांना जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, प्रशांत गडाख, शंकर लोखंडे, नंदू पाटील, सभापती श्रीरंग हारदे, अरुण जाधव, संदीप कुऱ्हाडे, आप्पासाहेब जाधव, निजामभाई इनामदार, भैय्यासाहेब देशमुख, सोमनाथ धूत, नानासाहेब नवथर आदींची उपस्थिती होती.
(प्रतिनिधी)

Web Title: Crisis on farmers due to Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.