सीआयडीने सुरू केला केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:17 AM2018-05-24T10:17:39+5:302018-05-24T10:17:39+5:30

केडगाव हत्याकांडाचा तपास बुधवारी सीआयडी पथकाने विशेष पथकाकडून वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी अरूणकुमार सपकाळे हे पथकासह नगर येथे दाखल झाले असून, गुन्ह्याची कागदपत्रे हातात येताच त्यांनी तपासाला सुरूवात केली.

CID launches Kedgaon double murder investigation | सीआयडीने सुरू केला केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास

सीआयडीने सुरू केला केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास

Next
ठळक मुद्देशिवसैनिकांची हत्या : गुन्ह्याची कागदपत्रे वर्ग करून घेतली

अहमदनगर : केडगाव हत्याकांडाचा तपास बुधवारी सीआयडी पथकाने विशेष पथकाकडून वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी अरूणकुमार सपकाळे हे पथकासह नगर येथे दाखल झाले असून, गुन्ह्याची कागदपत्रे हातात येताच त्यांनी तपासाला सुरूवात केली.
स्थानिक तपासी यंत्रणेवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने केडगाव हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्याची विनंती गृहविभागाकडे केली होती. गृह विभागाने मान्यता दिल्यानंतर सीआयडीचे पोलीस उपाधीक्षक अरूणकुमार सपकाळे यांची तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. बुधवारी सपकाळे यांनी हा तपास वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणात आता सीआयडी नव्याने काय तपास करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली. याप्रकरणी मयत संजय यांचा मुलगा संग्राम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ३० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी पोलिसांनी ८ तर इतर २ अशा १० जणांना आतापर्यंत अटक झालेली आहे.  उर्वरित २२ जण फरार आहेत.

आतापर्यंत यांना अटक
आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास उर्फ बी़एम़ कोतकर, रखी खोल्लम, संदीप गि-हे, महावीर मोकळे, विशाल कोतकर, बाबासाहेब केदार व भानुदास एकनाथ कोतकर

या २२ जणांचे काय होणार ?
आमदार अरूण जगताप, आ. शिवाजी कर्डिले, संदीप कोतकर, औदुंबर कोतकर, अशोक कराळे, नवनाथ कराळे, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्निल पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गांगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे, ज्ञानेश्वर कोतकर असे २२ जण फरार आहेत. सीआयडी पथक यांच्याबाबत काय भूमिका घेणार हा उत्सुकतेचा विषय आहे.

Web Title: CID launches Kedgaon double murder investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.